घररायगड‘हॅलो आमदार’ हेल्पलाईनद्वारे नागरिकांना सहाय्य

‘हॅलो आमदार’ हेल्पलाईनद्वारे नागरिकांना सहाय्य

Subscribe

कोरोना रुग्णांना सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठी स्थानिक आमदार रवी पाटील यांनी ‘हॅलो आमदार’ हेल्पलाईन सुरू केली असून, याची माहिती त्यांनी सोमवारी सुधागड दौर्‍यात दिली.

कोरोना रुग्णांना सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठी स्थानिक आमदार रवी पाटील यांनी ‘हॅलो आमदार’ हेल्पलाईन सुरू केली असून, याची माहिती त्यांनी सोमवारी सुधागड दौर्‍यात दिली. याबरोबरच तोरणपाडा वादळ नुकसानीची पाहणी केली. वावळोली कोविड केअर सेंटर आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथे योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाटील यांनी सांगितले की, तब्बल एक कोटी रुपयांचा आमदार निधीचा वापर कोविड संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी करणार आहे. याबरोबरच सुधागड तालुक्यातील जनतेसाठी कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका देणार आहे. जनतेला कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येईल. पेण येथे कोविड रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येतील. वावळोली कोविड केअर सेंटर आणि पालीसह जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक साधन सामग्री पुरविली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

तसेच अवकाळी वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या तोरणपाडा, भैरव आदी गावांना जलद नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे देखील सांगितले. तालुक्यात पूर्ण लॉकडाऊन करण्याच्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या मागणीला पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात योग्य चर्चा करून अमंलबजावणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, तालुका सरचिटणीस सागर मोरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख, तहसीलदार दिलीप रायन्नावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, डॉ. नंदकुमार मुळे, सरपंच रोहन दगडे, सरपंच भाऊराव कोकरे, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

हॅलो आमदार हेल्पलाईन

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णवाहिका सेवा हवी असल्यास, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्यास, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्यास, गृहविलगिकरण असलेल्या व्यक्तीस मदत हवी असल्यास, कोणती वैद्यकीय मदत मिळत नसल्यास 7798095757 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -