घररायगडऐतिहासिक जंजिरा किल्ला बंद; पर्यटकांसह व्यावसायिकांमध्ये नाराजी

ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंद; पर्यटकांसह व्यावसायिकांमध्ये नाराजी

Subscribe

मुरुड: तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला सोमवारपासून बंद करण्यात आला. त्यामुळे सोमवारी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला असून काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अजून पावसाला सुरुवात झाली नाही तोच पुरातत्व विभागाने किल्ला बंद केला. आणखी आठ दिवस किल्ला चालू ठेवला असता तर येथील व्यावसायिकांना व्यवसाय मिळाला असता, असे म्हणत येथील व्यायसियकांनीही या निर्णयाबाबात नाराजी व्यक्त केली. परंतु किल्ला बंद केल्यामुळे आम्हाला किल्ला न पाहता परतावे लागत आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने यांचा पुनर्विचार करून किल्ला पर्यटकांसाठी आठ दिवस तरी खुला करावा जेणेकरून पर्यटकांना किल्ला न पाहता परतावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करीत आहेत.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी विविध जिल्ह्यांतून शेकडो पर्यटक मोठ्या संख्येने आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन सोमवारी राजपुरी जेटीवर किल्ला पाहण्यासाठी दाखल झाले होते. परंतु किल्ल्याचा दरवाजा बंद असल्याने किल्ला न पाहता पर्यटकांना निराश होऊन पुन्हा मागे परतावे लागले. काही पर्यटकांनी आपल्या मोबाईलवरुन सेल्फी काढून समाधान मानावे लागले. तर काही पर्यटकांनी शिडाच्या बोटींमधून किल्ल्यास प्रदक्षिणा घालून किल्ल्याचे रूप बाहेरून पाहण्यात समाधान करून घेतले.

पुरातत्व अधिकारी बजरंग येलेकर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले दरवर्षी प्रमाणे व नियमाप्रमाणे किल्ला बंद केला आहे. हा किल्ला तीन महिने बंद राहणार असून सप्टेंबर महिन्यात वातावरण बघून किल्लाचे दरवाजे उघडले जातील, तोपर्यंत नाही. पर्यटकांचा जीव महत्वाचा आहे. गेल्या शनिवारी जोरदार लाटा आणि हवेमुळे बोट किल्ल्याजवळ लावते वेळी पर्यटकांचा पायला मोठी दुखापत झाली. आमच्या जवळील मेडीसीन असल्याने पर्यटकांच्या पायाला योग्य तो उपचार करण्यात आला. हे दिवस वादळी दिवस जोरदार लाटा येत असतात येणारा पर्यटक उत्साही असतो त्याची काळजी घेणे आमचं क्रमप्राप्त आहे.
बजरंग येलेकर,
अधिकारी पुरातत्व खाते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -