Maharashtra Assembly Election 2024
घरराजकारणUddhav Thackeray : भाजपा 'चारसौ पार' कशी जाते, तेच बघतो; ठाकरेंचं खुलं...

Uddhav Thackeray : भाजपा ‘चारसौ पार’ कशी जाते, तेच बघतो; ठाकरेंचं खुलं आव्हान

Subscribe

रायगड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. ते रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा त्यांचा दौरा असून या  दौऱ्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत, जाहीर सभांमधून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. आज रायगड दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपासह एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. (How BJP goes four hundred thats what we see Uddhav Thackeray open challenge)

हेही वाचा – Prashant Kishor : मोदींनंतर भाजपचे नेतृत्व? प्रशांत किशोर म्हणतात.. तो अधिक कट्टर असेल

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीवेळी मीच भाजपाच्या प्रचाराला आलो होतो. यांना (नरेंद्र मोदी) पंतप्रधान करा, असं मीच सांगितलं होतं. त्यानंतर आताही मीच आलो आहे. पण आता आपल्याला हुकुमशाही नको आहे. गेल्या आठवड्यात 26 जानेवारी रोजी देशाने प्रजासत्ताक दिन साजरा केला. तेव्हा आपण म्हणालो की, प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. पण आता परत एकदा तीच प्रार्थना करावी लागेल. कारण, पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन होणारच नाही असं वाटतं आहे. या लोकांनी देशाची राज्यघटना पायदळी तुडवली आहे. भर दिवसा घटनेचा आणि लोकशाहीचा मुडदा पाडला जात आहे. प्रत्येकावर दबाव आणला जात आहे. जे-जे विरोधी पक्षात आहेत, विरोध करत आहेत, त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझा पक्ष चोरला, सगळं चोरल्यानंतर आता माझ्या लोकांच्या मागे का लागला आहात? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, तुम्ही आगामी निवडणुकीत 400 पारचा नारा देत आहात ना? मग व्हा 400 पार, आता तर आम्ही बघतोच, तुम्ही 400 पार कसे जाणार ते. माझ्या साध्या साध्या लोकांना पोलिसांतले जुने खटले काढून त्रास दिला जात आहे. जुनी प्रकरणं उकरून आयकर विभागाच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. परंतु, तुमच्याकडे जे टोणगे आलेत, जे बाजारबुणगे आलेत त्यांच्यावरील खटल्यांचं काय झालं? असा पश्नही उद्धव ठाकरे यांनीही विचारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : अखेर प्रकाश आंबेडकर मविआच्या बैठकीला हजर; राऊत म्हणतात, भाजपाला मदत होईल…

रायगड दौऱ्याचा दुसरा दिवस

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारपासून मिशन कोकण हाती घेतले असून या दौऱ्याच्या माध्यमातून ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. आज कोकण दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते रायगड जिल्ह्यात आहेत. आज त्यांनी पोलादपूर, म्हसळा आणि माणगावातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात सभा घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -