घररायगडकर्जतमध्ये हम्पड ग्रॉस हॉपर या दुर्मिळ नाकतोड्याचे दर्शन

कर्जतमध्ये हम्पड ग्रॉस हॉपर या दुर्मिळ नाकतोड्याचे दर्शन

Subscribe

वेगळ्याच आकाराचा नाकतोडा दिसून आल्याने बघ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

कर्जत तालुका हरित पट्टा ( ग्रीन झोन ) म्हणून घोषित आहे. आजही येथील जंगलातील जैवविविधता आढळते तसेच टिकून आहे . याचेच उत्तम उदाहरण म्हणजे कर्जत तालुक्यातील गौरकामथ परिसरात राज नाल्या लगतच्या गवतावर दुर्मिळ हम्पड ग्रॉस हॉपर जातीचा नेहमीपेक्षा वेगळ्याच आकाराचा नाकतोडा दिसून आल्याने बघ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. भारत आणि श्रीलंका येथील मूळ असलेल्या नाकतोड्याची ही एक प्रजाती आहे. ही ‘टेराटोड्स’ या जातीच्या प्रकारातील आहे. साग आणि चंदनाच्या झाडावर शक्यतो या दुर्मिळ नाकतोड्याचे वास्तव्य असते . हा हम्पड ग्रॉस हॉपर दुर्मिळ नाकतोडा पाने तसेच गवत खाऊन जगतो. हा नाकतोडा पानाच्या आकारासारखा दिसत असून अंग हिरवे ,कडेचा भाग पिवळा आणि सोंड नारंगी लालसर रंगाची असते. डोळे मोठ्या आकाराचे असून पांढऱ्या रंगाचे आहेत. हा नाकतोडा हानिकारक नसल्याची माहिती प्रादेशिक कृषी संशोधन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ . रवींद्र मर्दाने यांनी दिली आहे.

१८३५ मध्ये गॅसपार्ड ऑगस्टे ब्रुली यांनी या नाकतोड्याचे नामकरण केले. गॅसपार्ड ऑगस्टे ब्रुली एक फ्रेंच कीटकशास्त्रज्ञ होता. यांना लहाणपणापासूनच कीटकांबाबतीत आकर्षण होते. १८३२ मध्ये, त्यांनी सोसायटी एंटोमोलॉजिक डी फ्रान्सच्या पायाभूत संस्थेत सहभाग घेतला.

- Advertisement -

नाकतोडा ही कीड फक्त गवत वर्गीय पिके जसे साळ, ऊस, ज्वारी, मक्का, बाजरा, चारा गवत इत्यादींवर प्रादूर्भाव करते. ॲक्रिडिडी कुलातील बरेच नाकतोडे निरनिराळ्या पिकांवरील किडी असून त्यांच्यामुळे पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हानी होते. त्यांपैकी भारतात खुरपाडी, बिनपंखी नाकतोडा, पट्टेदार नाकतोडा, भातावरील नाकतोडा इ. नाकतोडे पिकांची हानी करतात. याशिवाय पिकांचा संपूर्ण नाश करणारे व जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे वाळवंटी टोळही ह्याच कुलात येतात. मात्र कर्जत मध्ये आढळलेला हम्पड ग्रॉस हॉपर हा दुर्मिळ नाकतोडा हानिकारक नाही असे, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, चार कर्मचाऱ्यांनी घेतला राज विरोधात साक्ष देण्याचा निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -