Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर रायगड कर्जतमध्ये शाळा परिसरातील वाहतूक कोंडी हटेना

कर्जतमध्ये शाळा परिसरातील वाहतूक कोंडी हटेना

Subscribe

शहरातील कोतवाल नगरमधील शाळा परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती ‘येरे माझ्या मागल्या’ अशी झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अभिनव ज्ञान मंदिर, शारदा मंदिर, शिशु मंदिर या शाळांलगत न्यायालय देखील आहे. त्यामुळे येथे वेगाने वाहन चालविणे, तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. मात्र या बंदीला हरताळ फासण्याचे काम तरुणाईकडून होत आहे.

कर्जत : शहरातील कोतवाल नगरमधील शाळा परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती ‘येरे माझ्या मागल्या’ अशी झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
अभिनव ज्ञान मंदिर, शारदा मंदिर, शिशु मंदिर या शाळांलगत न्यायालय देखील आहे. त्यामुळे येथे वेगाने वाहन चालविणे, तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. मात्र या बंदीला हरताळ फासण्याचे काम तरुणाईकडून होत आहे. धूम स्टाईल वेग आणि हॉर्न वाजवत त्यांची (अनाठायी) जा-ये सुरू असते. विशेष म्हणजे यापैकी अनेकांकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याचे उघडपणे बोलले जाते. तसेच शाळांच्या परिसरात वाहने घेऊन येणार्‍या रोडरोमिआेंची हुल्लडबाजी पहावयास मिळते. या वाहनांची वर्दळ असताना पालकही आपल्या लहान मुलांना नेण्यासाठी वाहन घेऊन येत असल्याने वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कोतवाल नगरमधील रहिवाशी संघाने काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांना निवेदन दिले होते. त्यांनतर काही काळ कोंडीची समस्या दूर झाली. आता परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
भरधाव वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सुसाट वाहनचालकांना वेळीच आवरून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तर बेशिस्त वाहतुकीमुळे मुलांना शाळेत एकटे-दुकटे पाठविण्यास पालक तयार नसतात.

सर्वच दोष प्रशासनाला देणे योग्य नाही. यावर उत्तम उपाय म्हणजे सर्वांनी मिळून वाहतुकीचे नियम योग्य प्रकारे अमलात आणले पाहिजेत.
– वनिता सोनी, कर्जत

- Advertisement -

१८ वर्षावरील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना देण्याचा नियम आपल्या देशात आहे. तरीही या वयाच्या आतील मुले सर्रास वाहन चालविताना दिसतात. शाळा परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या तात्काळ सोडविण्याची गरज आहे.
-संजय हरपुडे, रहिवासी, कोतवाल नगर

बेशिस्त वाहनचालकांना वेळीच आवरणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडीला यांच्यामुळे हातभार लागत असून, पोलिसांकडून कठोर कारवाईची गरज आहे.
-विजय बेडेकर, सामाजिक कार्यकर्ता
________________

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -