घररायगडकोणी बेड देता का बेड...; बाधितांचे नातेवाईक झाले हवालदिल

कोणी बेड देता का बेड…; बाधितांचे नातेवाईक झाले हवालदिल

Subscribe

रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत चालली असताना प्रशासनाने केलेल्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. दुसरीकडे रेमडेसिविर, ऑक्सिजनची टंचाई निर्माण होत आहे. वाढत्या रूग्ण संख्येच्या तुलनेत दवाखान्यामध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत.

रायगड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत चालली असताना प्रशासनाने केलेल्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. दुसरीकडे रेमडेसिविर, ऑक्सिजनची टंचाई निर्माण होत आहे. वाढत्या रूग्ण संख्येच्या तुलनेत दवाखान्यामध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. जिल्हा रुग्णालयासह सर्व खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसून, परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांच्यावर बेड देता का बेड, अशी आर्त विचारणा करण्याची वेळ आली आहे.

उपचारासाठी दाखल होणार्‍या नागरिकांना सहज बेड उपलब्ध व्हावेत यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये 5 हजार 86 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ऑक्सिजन सपोर्ट नसणारे 3 हजार 552 , ऑक्सिजन सपोर्ट असणारे 1 हजार 42, आयसीयू बेड 311 , व्हेन्टिलेटर्स 181 बेडचा समावेश आहे. रुग्णालयांमध्ये असणारे 3 हजार 552 बेड केवळ कोरोनाच्या रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यासाठी आहेत. ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या आणि व्हेंटिलेटर बेडची खरी गरज रुग्णालयांमध्ये आहे. हे सर्व बेड आजच्या घडीला भरले आहेत. यामुळे नव्याने दाखल होणार्‍या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे बेड शिल्लक नाहीत. परंतु शासनाच्या माहिती प्रमाणे बेड शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. हि आकडेवारी अपडेट केली नसल्याने हे बेड शिल्लक असल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये ९० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कोरोनाबाधित प्रत्येक रुग्णाला उपचार मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे.
– निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी डोळे विस्फारायला लावणारी आहे. जिल्ह्यात दररोज बाधित रुग्ण सापडण्याचा संसर्ग हजारांचा आकडा पार करणारा आहे. आजमितीला बाधित असणार्‍या रुग्णांची संख्या १० हजार ९४ इतकी आहे. यापैकी सुमारे ६ हजार ५८२ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित ३ हजार ५१२ रुग्ण गृह विलगिकरणात आहेत. रोजच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नव्याने दाखल होणार्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करायचे झाले तर कोठे, असा सवाल आरोग्य यंत्रणांसमोर आहे. यासाठी कुणी केलेली रदबदलीही वाया जात आहे. अनेकांकडे पैसे आहेत, परंतु उपचार होत नाहीत. यात रुग्णांबरोबर नातेवाईकांची फरफट होत असून, सुसज्ज यंत्रणेसाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकदिलाने काम करण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Double Mutant, वेरीयंट्स विरोधात Covaxin प्रभावी, ICMR चे शिक्कामोर्तब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -