HomeरायगडLadki Bahin : अंगणवाडी सेविकांचे काही चुकले का, लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन...

Ladki Bahin : अंगणवाडी सेविकांचे काही चुकले का, लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता का मिळत नाही

Subscribe

अलिबाग : जुलैमध्ये महायुती सरकारने लक्षवेधी माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेच्या लिखापढीसाठी अंगणवाडी सेविकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली होती. आता ही योजना सुरू होऊन सहा महिने झाले. लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळू लागले आहेत. मात्र, अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने, आमचे काही चुकले का, असा सवाल अंगणवाडी सेविका विचारत आहेत.

रायगड जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील 2 लाख 70 हजार महिलांचे अर्ज 2 हजार 824 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ऑनलाईन भरून दिले. त्यासाठी त्यांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार होता. यासाठी 1 कोटी 35 लाख रुपये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना देणे लागते. मात्र, योजना प्रत्यक्षात येऊनही सहा महिने होत आले अजून अंगणवाडी सेविकांना त्यांचा भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे ही रक्कम केव्हा मिळेल, असा सवाल त्या विचारत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा…  Ladki Bahin : लाडकी बहिणींमुळे शिक्षकांचे पगार रखडले? आदिती तटकरे म्हणाल्या….

सरकारने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केल्यानंतर योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ही योजना यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांनी त्यांची नियमित कामे करत असतानाच ग्रामीण भागातील महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम केले. अनेकदा इंटरनेटची समस्या होती, सरकारच्या पोर्टलवर अर्ज भरताना तारेवरची कसरत करावी लागत. तरीही दिवसरात्र मेहनत घेत अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरून घेतले. त्यामुळेच ही योजना महिलांसाठी फायदेशीर आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. त्यानंतरही 50 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात दिरंगाई होत असल्याने रायगडसह राज्यातील अंगणवाडी सेविका नाराज आहेत.

- Advertisement -

निधी येताच भत्ता देऊ!

रायगडमधील 2 लाख 70 हजार महिलांचे ऑनलाईन अर्ज 2 हजार 824 अंगणवाडी सेविकांनी भरले आहेत. त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. कार्यवाही सुरू असून निधी आल्यानंतर अंगणवाडी सेविकांना भत्ता दिला जाईल, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग) निर्मला कुचिक यांनी दिली.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -