घररायगडस्थानिक कामगारांना कामावरून कमी केले; कंपनी समोर ग्रामस्थांचा घेराव

स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले; कंपनी समोर ग्रामस्थांचा घेराव

Subscribe

खालापूर तालुक्यातील वावोशी हाद्दीतील हुतामाकी कंपनी प्रशासनाने शिरवली गावासह वावोशी, गोरठण बुद्रुक, आदी स्थानिक गावातील कामगारांना एकाकी कामावरून काढून टाकत असल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांचे कुटुंब, स्थानिक ग्रामस्थ कंपनीच्या गेटवर ठिय्या टाकून बसलेले होते.

खोपोली: खालापूर तालुक्यातील वावोशी हाद्दीतील हुतामाकी कंपनी प्रशासनाने शिरवली गावासह वावोशी, गोरठण बुद्रुक, आदी स्थानिक गावातील कामगारांना एकाकी कामावरून काढून टाकत असल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांचे कुटुंब, स्थानिक ग्रामस्थ कंपनीच्या गेटवर ठिय्या टाकून बसलेले होते.
आज एका ला कामावरून काढले उद्या आमच्या गावातील, घरातील प्रत्येक कामगाराला देखील एकाकी कामावरून काढले तर आमच्या कुटुंबाचे काय? आम्ही खायचे काय आमच्यावर उपासमारीची वेळ येईल व आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन या धास्तीने येथील स्थानिक महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. कंपनीने कामगारांविरुद्ध घेतलेले असे हूकुमशाही पद्धतीचे निर्णय मागे घेण्यात यावे याकरिता शिरवली ग्रुपग्रामपंचायतचे सरपंच शैलेश मोरे, राष्ट्रवादीचे नेते शंकर मानकावळे, एच.आर.पाटील यांनी देखील कंपनी प्रशासनासोबत चर्चा केली परंतू कंपनी प्रशासनाने आपला निर्णय वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून शुक्रवारी देणार असल्याचे सांगितले आहे. परंतू ठोस निर्णय तात्काळ होत नाही तोपर्यंत आम्ही गेटवरील आमचे ठिय्या आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका स्थानिक महिला व ग्रामस्थांनी घेतली होती. शिवाय येथील संतप्त झालेल्या स्थानिक गावातील ग्रामस्थांचा जमाव देखील वाढतच होता. त्यामुळे बराच वेळ येथील परिस्थिती तणाव पूर्ण बनलेली होती. त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता खालापूर चे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन आरोटे, निलेश सोनावणे यांनी स्थानिक ग्रामस्थ व कंपनी प्रशासन यांच्याशी चर्चा करून सदरील परिस्थिती नियंत्रणात आणली असून आज शुक्रवारी हुतामाकी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आपला निर्णय देणार आहेत. परंतू आज हुतामाकी कंपनी प्रशासन येथील स्थानिक कामगारांविषयी कोणती भूमिका घेणार याकडे मात्र स्थानिक कामगार व ग्रामस्थ यांचे लक्ष लागून राहिले आहे.
———-

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -