घररायगडमियावाकी वनांचा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प पनवेलमध्ये

मियावाकी वनांचा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प पनवेलमध्ये

Subscribe

या प्रकल्पासाठी रोटरी क्लबला भूखंड देण्यास बुधवारी झालेल्या विशेष महासभेत मंजूरी देण्यात आली. सध्याच्या हा महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. यामुळे हा परिसर हिरवागार तर होईलच. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पशू - पक्षांचा रहिवास वाढेल आणि त्याचा फायदा पर्यावरणालाही होईल

महापालिका हद्दीत प्रभाग क्रमांक १९ मध्ये हळदीपूरकर हॉस्पिटलजवळ डेंस ग्रीन मियावकी फॉरेस्ट म्हणजेच अधिकाधिक हिरवाई निर्माण करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची ’मियावाकी’ वने विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी रोटरी क्लबला भूखंड देण्यास बुधवारी झालेल्या विशेष महासभेत मंजूरी देण्यात आली. सध्याच्या हा महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. यामुळे हा परिसर हिरवागार तर होईलच. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पशू – पक्षांचा रहिवास वाढेल आणि त्याचा फायदा पर्यावरणालाही होईल

पनवेल महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमहापौर सीता पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, स्थायी समिति सभापति नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त कैलास गावडे उपस्थित होते. पुर्वाश्रमीच्या नगरपरिषदेमार्फत ६वाणिज्य संकुलातील ३० वर्षाच्या कालावधीसाठी भाडे तत्त्वावर देण्यात आलेले गाळे लीज करारनामा व हस्तांतर करणे या १९ एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत स्थगित ठेवलेल्या विषयाला मान्यता देण्यासाठी ही विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती.

- Advertisement -

यावेळी ६ व्यापारी संकुळातील ३५५ व्यापारी गाळे विद्यमान गाळे धारकांस तत्कालीन नगरपरिषद कायद्याप्रमाणे निविदा पध्दतीने व आरक्षणानुसार वाटप करण्यात आलेले असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली. नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचा विरोध नोंदवून यास मान्यता देण्यात आली. बैठकीत महापालिकेच्या मालकीचा शहरातील भूखंड क्रमांक २७३ हा डेंस फॉरेस्ट तयार करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलला देण्यास सर्वानुमतांनी मंजूरी देण्यात आली. यामध्ये हरित क्षेत्र विकसित करण्यासाठी महापालिका कोणताही मोबदला देणार नाही. वृक्ष रोपणाच्या आराखड्यास महापालिकेची परवानगी घ्यायची असून तेथील झाडांची देखभाल अकरा महिने रोटरी क्लबने विना मोबदला करायची आहे.

भूखंड क्रमांक २७३ हा उद्यानासाठी राखीव होता. तो रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलला डेंस फॉरेस्ट तयार करण्यासाठी देण्यास मंजूरी दिली. सध्याच्या काळातील हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा डेंस ग्रीन मियावकी फॉरेस्टचा प्रकल्प आहे. यामुळे पनवेलमध्ये हरित क्षेत्राचे, पक्षू-पक्षांचे प्रमाण वाढेल.
– परेश ठाकूर, सभागृह नेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -