Maharashtra Assembly Election 2024
घररायगडRaigad News : रायगडमध्ये किती आहे पशुधन, मार्च 2025 आकडेवारी होणार जाहीर

Raigad News : रायगडमध्ये किती आहे पशुधन, मार्च 2025 आकडेवारी होणार जाहीर

Subscribe

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पशुधन किती आहे, याची मोजदाद सोमवारपासून (25 नोव्हेंबर) सुरू करण्यात आली आहे. यात गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी-मेंढी तसेच घोडे, वराह, बदक आणि कुक्कुट पक्ष्यांची गणना केली जाणार आहे. दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. या मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी निवासस्थानातील गायवर्गीय पशुगणनेने करण्यात आली. 28 फेब्रुवारीपर्यंत चालणारी ही मोहीम 129 प्रगणक आणि 27 पर्यवेक्षक फत्ते करणार आहेत.

पशुगणनेमुळे जिल्ह्यातील जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होते. त्यानुसार सरकारकडून धोरण, योजना आखल्या जातात शिवाय त्यासाठी निधीची उपलब्धता केली जाते. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार लसीकरणासाठी औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील पशुधनाची खरी आकडेवारी पशुमालकांनी द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले. रायगड जिल्ह्यात 21 व्या पशुगणनेच्या शुभारंभाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा…  Assembly Election Result 2024 : ईव्हीएम गोंधळ सुरूच, निवडणुकीत 5 लाख 4 हजार 313 अतिरिक्त मते? मतदान आणि मतमोजणीत मोठी तफावत

2019 मधील रायगडमधील पशुधन

  • गाय 1 लाख 76 हजार 906
  • म्हैस 62 हजार 225
  • शेळी 90 हजार 188
  • मेंढी 2 हजार 203
  • डुक्कर 513
  • बदक 1 हजार 472
  • कुक्कुट पक्षी 40 लाख 24 हजार 523

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -