घरमहाराष्ट्रनागपूरUday Samant : नारायण राणेंना शिवसेनेतून उमेदवारी दिली जाणार? उदय सामंत म्हणतात...

Uday Samant : नारायण राणेंना शिवसेनेतून उमेदवारी दिली जाणार? उदय सामंत म्हणतात…

Subscribe

नागपूर : महाराष्ट्रातील इतर काही जागांप्रमाणेच कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग यासह शिवसेनेने लढविलेल्या सर्व जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडली होती. त्यातच उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. याशिवाय भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दावा केला आहे की, पक्षाने तिकीट दिलं तर मी निवडणून येईल. याचसंदर्भात आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी भाष्य केलं आहे.

हेही वाचा – Loksabha Election 2024 : किरण सामंत यांच्या माघारीनंतर बंधू उदय म्हणतात…, आमचा दावा कायम

- Advertisement -

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा राणेंनाच मिळणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि विरोधकही असा आरोप करत आहेत. या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, विरोधकांना दुसरं काहीच भांडवल नसल्यामुळे ज्या ठिकाणी जागा वाटाघाटीसाठी थांबल्या आहेत, त्याच्यावर चर्चा करणं, तेथील लोकांची बदनामी करणं, त्यातून आपलं काही साध्य होतं आहे का? हे बघण्याचं काम ते करत असतात. परंतु महायुती एवढी मजबूत आहे की, याचा कसलाही परिणाम महायुतीवर होणार नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा आम्ही मोठ्या फरकाने जिंकू हे कालदेखील मी सांगितलं आहे, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : एनसीपी-एसपीच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल, शिंदे गटाला निर्देश…

- Advertisement -

नारायण राणेंना तिकीट देऊन शिवसेनेतून उमेदवारी दिली जाणार का? या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, शिवसेनेतून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एकच उमेदवार आहे. त्यामुळे दुसऱ्या उमेदवाराशी आम्ही चर्चा केलेली नाही आणि नारायण राणे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर मी काही चर्चा करणं किंवा बोलणं हे माझ्या राजकीय अधिकारात बसत नाही. नारायण राणे यांचे विचार स्वतंत्र असू शकतात. त्यांच्या विचारांवर आम्ही नाराज नाही. त्यांनी कालच सांगितलं आहे की, जबाबदारी आणि तिकीट मला दिलं तर मी निवडून येईल. त्यामुळे प्रत्येक पक्षाला ते बोलण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -