Homeरायगड’ मतदानाला जायायचे आहे, आपले कर्तव्य बजावायचे आहे’; खालापूरात मतदार जनजागृती

’ मतदानाला जायायचे आहे, आपले कर्तव्य बजावायचे आहे’; खालापूरात मतदार जनजागृती

Subscribe

खालापूरात मतदार जनजागृती

चौक-: मतदारांना आकर्षित आणि जागृत करण्यासाठी उप विभागीय अधिकारी व तहसीलदार खालापूर यांच्यावतीने खोपोली ते कर्जत (व्हाया पळसदरी मार्गी) सायकल रॅली काढण्यात आली.( Lok Sabha Election Voter Awareness Campaign Raigad District) निवडणूक आयोगाचे निर्देशाप्रमाणे १८९ -कर्जत विधानसभा मतदार संघात SVEEP (systematic voters education and electors participation ) अंतर्गत मतदान जनजागृती करिता रॅली काढण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादनाने झाली.त्यानंतर उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.मी मतदान करणारच…अशा आशयाचे मतदान जनजागृतीचे टी-शर्ट परिधान करून व सायकल ला मतदान जनजागृती चे झेंडे लावून पळसदरी मार्गे ही सायकल रॅली कर्जतकडे रवाना झाली.
कर्जत येथे प्रशासकीय भवनात मतदार जागृती पर स्वरचित गीत शिक्षक राम बिरादार यांनी कर्जत तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी दौंड व खालापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमले यांच्या उपस्थितीत गायन करुन कार्यक्रमाची सांगता केली.