महाविकास आघाडीकडून शिवरायांची अवहेलना केल्याचा आरोप

महाविकास आघाडीच्या वतीने नुकताच राज्यपाल यांच्या एका वक्तव्यावर करण्यात आलेल्या निषेध आंदोलनावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची अवहेलना करण्यात आली असल्याचा आरोप करीत शिंदे गटाने आंदोलन केले.

खोपोली: महाविकास आघाडीच्या वतीने नुकताच राज्यपाल यांच्या एका वक्तव्यावर करण्यात आलेल्या निषेध आंदोलनावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची अवहेलना करण्यात आली असल्याचा आरोप करीत शिंदे गटाने आंदोलन केले. महाविकास आघाडीच्या काही अतिउत्साही आंदोलकांनी जे कृत्य केले त्यातून महाराजांची अवहेलना झाल्याने त्याचा सर्वत्र निषेध होत आहे.शुक्रवारी शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा खेडेकर, प्रिया जाधव यांच्याकडून महाराजांचे दुग्ध अभिषेक घातला गेला आणि खोपोलीत अतिउत्साही राजकारणी लोकाकडून जो अतिउत्साहात प्रकार घडलं त्याची महाराजांसमोर त्यांच्या अनुषंगाने आमच्याकडून माफी मागण्यात आली असं अनोखा आंदोलन बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिार्‍यांनी महाराज्यांच जयजयकाराच्या घोषणा देत माफ करा… माफ करा… महाराज आम्हाला माफ करा… अशा घोषणा देण्यात आल्या.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते खासदार त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने सर्वत्र त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीसह अन्य सामाजिक संघटना शिवप्रेमी आक्रमक झाले आणि निदर्शन सुरू झाली. मंगळवारी शहरातील उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी आंदोलन करतेवेळी कोश्यारी आणि त्रिवेदी यांचा फोटो बॅनरवर छापून त्यावर छत्रपतींचा अवमान केलेला मजकूराचा उल्लेख केला होता.
शिंदे गट महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सुरेखा खेडकर, प्रिया जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. संदीप पाटील, तात्या रिठे, राजू गायकवाड, अमोल पाटील, ईश्वर शिंपी,मंगेश मोरे, संतोष माळकर, राकेश मिरवणकर, प्रशांत गोरे, रुपेश देशमुख, मुकेश रुपवते,अनुराग कोंडवले,संदीप नानेकर,किशोर पाटील,संतोष म्हामुंकर,राकेश गायकवाड निनाद वाजे विवेक आंग्रे आदी यावेळी उपस्थित होते.
नेमके काय घडले
आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करीत आक्रमक भूमिकेत असणार्‍या महिला कार्यकत्यांनी बॅनरच्या फोटोवर’ जोडे मारले. यावेळी बॅनर खाली पडला. त्यावेळेस या बॅनरच्या फोटोवर लाथा मारून राज्यपाल आणि भाजपाचे प्रवक्ते यांचा निषेध केला . मात्र या अतिउत्साही महिलांनी आंदोलनातील बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असल्याचे भान त्यांना राहिले नाही. त्यामुळे शिंदे गटातील शहरातील कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर आंदोलन करताना भान न ठेवता छत्रपती शिवाजी महारराजांचा अवमान केल्याचा आरोप करून निषेध व्यक्त केला.
आम्हाला कोणावरही टीका करायची नाही पण जोश मध्ये आणि अती उत्साह मध्ये आपण केलेली चूक ही निदर्शनात आणणे साठी आम्ही सर्व बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्ते एकत्रितपणेे महाराजांच्या समोर जावून सदर जबाबदार राजकीय नेत्यांविरोधात निषेध नोंदवला.
– संदीप पाटील
शहर प्रमुख बाळासाहेब शिवसेना, खोपोली
————————-