घररायगडमहाड एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

महाड एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

Subscribe

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. गेल्या अर्ध्या तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत

रायगडमधल्या महाड एमआयडीसीत भीषण आग लागली. मल्लक स्पेशालिटी कंपनीला ही आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्नीशमन दल दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. गेल्या अर्ध्या तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

महा़ड एमआयडीसीतील मल्लक कंपनीमध्ये रंग बनवण्याची कामे चालतात. यात अनेक केमिकल घटकांचा साठा मोठ्या प्रमाणात केला जातो. यात इथेनॉल ऑक्साईडचा मोठा साठा असल्याने ही आग वेगाने पसरू लागली आहेत. ही आग इतकी भीषण आहे की आगीच्या धुराचे लोट आकाशात सगळीकडे पसरू लागले आहेत. आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागताच आजूबाजूचे लोक घाबरून गेले आहेत.

- Advertisement -

या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. रंगनिर्मितीत इथेनॉल ऑक्साईड या अत्यंत ज्वालाग्राही द्रवपदार्थाचा प्रामुख्याने वापर केला जातो. नेमक्या त्याच ठिकाणी ही आग भडकल्याने रौद्ररूप धारण केले. या कंपनीत रंगाचा साठा मोठ्या प्रमाणात आग पसरली आहे. जोपर्यंत हा रंगाचा साठा जळून खाक होत नाही तोपर्यंत ही आग विझवणं अवघड झालं आहे. ही आग विझवण्यासाठी पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -