HomeरायगडMahad Morcha : महाडकरांचा मूक मोर्चा कशासाठी, महाडमध्ये अचानक काय घडलं

Mahad Morcha : महाडकरांचा मूक मोर्चा कशासाठी, महाडमध्ये अचानक काय घडलं

Subscribe

महाड : येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांची आणि वैद्यकीय पदांची कमतरता आहे. परिणामी या ठिकाणी योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. याबाबतीत अनेकवेळा चर्चा होऊनही कायम दुर्लक्ष केले गेले आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावर झालेल्या अपघातात महाडमधील चौघांचा मृत्यू झाला होता. यातील जखमींवर योग्य उपचार झाला नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. यामुळे ट्रॉमा केअरचा कारभार सुधारावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाडकरांनी मंगळवारी (7 जानेवारी) मूक मोर्चातून दिला.

महाडमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारीच महाड ट्रॉमा सेंटर उभारण्यात आले आहे. हे रुग्णालय उभे झाल्यापासूनच या ठिकाणी योग्य उपचारांची आणि डॉक्टरांची वानवा आहे. इतर सुविधाही उपलब्ध नसल्याने रुग्णांना शहरात पैसे खर्च करून उपचार करून घ्यावे लागत आहेत. अनेक वेळा मुंबईसारख्या ठिकाणी पदरमोड करत उपचारासाठी जावे लागत आहे. पोलादपूरपासून माणगावपर्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जखमींना आणल्यानंतर अधिक उपचाराकरता मुंबईसारख्या ठिकाणी नेण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे महाड ते मुंबई असा सुमारे चार तासाचा प्रवास करावा लागतो. यादरम्यान योग्य उपचार मिळाल्यास रुग्ण वाचू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा…  Panvel News : तळोजातील बेकायदा धाबे, शेड जमीनदोस्त, पनवेल महापालिका, सिडकोची कारवाई

- Advertisement -

अपघातग्रस्त अनेक रुग्णांना या ठिकाणी उपचार न मिळाल्यामुळे मुंबईमध्ये हलवावे लागते. अनेकांचा मुंबईला नेतानाच मृत्यू होतो. काही दिवसांपूर्वी वीर रेल्वे स्टेशनबाहेर झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचाराकरता मुंबईमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. या दरम्यान हे जखमी दगावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. म्हणूनच महाडकरांनी महाड ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात मूक मोर्चा काढला.

हेही वाचा…  Uran News : उरणमधील वायु वीज प्रकल्प व्हेन्टिलेटरवर, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा फटका

महाड शहरातून हा मोर्चा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर घेण्यात आला. तेथे महाडकरांनी रोष व्यक्त केला. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने आणि इतर सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत सरकारने ठोस पावले उचलले नाहीत तर महाडकर भविष्यात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -