Maharashtra Assembly Election 2024
घररायगडMaharashtra Election Result : उरणमधून भाजपचे बालदी पुन्हा जिंकले, शेकापच्या प्रीतम म्हात्रे...

Maharashtra Election Result : उरणमधून भाजपचे बालदी पुन्हा जिंकले, शेकापच्या प्रीतम म्हात्रे यांची टफ फाईट निष्फळ

Subscribe

पनवेल : उरण विधानसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. कारण इथे राजकीय तिढ्यामुळे तिरंगी लढत होती. या अटीतटीच्या लढतीत भाजपचे महेश बालदी विजयी झाले आहेत. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे यांचा 6 हजार 472 मतांनी पराभव केला आहे. तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनोहर भोईर तिसऱ्या स्थानावरच राहिले. महाविकास आघाडीचे दोन उमेदवार एकमेकांविरोधात लढल्याने भाजप उमेदवार विजयी झाल्याचे चित्र या मतदारसंघात दिसले.

महेश बालदी आणि प्रीतम म्हात्रे यांच्यात मतमोजणीच्या 27 फेऱ्यांमध्ये चढाओढ दिसून आली. अखेर बालदी यांना 95 हजार 121 मते मिळाली आणि शेकापचे प्रीतम म्हात्रे यांना 88 हजार 649 मते मिळाली. या दोघांच्या तुलनेत ठाकरे गटाचे मनोहर भोईर यांना 69 हजार 622 मते मिळाली. त्यामुळे ते पिछाडीवरच राहिले. महाविकास आघाडीमधील फूट महेश बालदी यांच्या फायद्याची ठरली. तरीही बालदी यांच्यासाठी ही निवडणूक अवघड होती.

- Advertisement -

हेही वाचा…  Maharashtra Election Result : पेणमधून पुन्हा भाजपच्या रवींद्र पाटील यांचा विजय, शेकापसह ठाकरे गटाचा धुव्वा

आगरी समाज आणि नवी मुंबई विमानतळाबद्दलच्या त्यांच्या वक्तव्यामुळे आगरी समाज त्यांच्यावर नाराज होता. बादली यांच्याकडून आगरी समाजाने माफीची मागणी केली होती. मात्र, या मागणीला बालदी यांनी ना प्रतिसाद दिला ना माफी मागितली.

- Advertisement -

हेही वाचा…  Maharashtra Election Result : भरत गोगावलेंचा विजयी चौकार, महाड विधानसभा मतदारसंघाचा रेकॉर्ड मोडला

अशी पार्श्वभूमी असताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आधीच उरणमधून प्रीतम म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. तर त्यानंतर महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाने माजी आमदार मनोहर भोईर यांना उमेदवारी दिली. दोन्ही बाजूंनी उमेदवारीचा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्यात आला होता. अशातच मतदानाच्या आदल्या दिवशी शेकापचे जयंत पाटील यांच्या नावाने पेण आणि उरणमधील जागेवर भाजपला पाठिंबा दिल्याचे बनावट पत्र व्हायरल झाले होते. अखेर शेकापने याची तक्रार निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे केली होती. मात्र, ठाकरे गट आणि शेकाप यांच्या वादात ही जागा भाजपच्या गळाला लागली.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -