घररायगडमविआचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेच! शरद पवार यांचा आग्रह असल्याचा दावा

मविआचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेच! शरद पवार यांचा आग्रह असल्याचा दावा

Subscribe

नव्या जोमाने शिवसैनिक सज्ज                                                                                              उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यातील एक सभा शहरातील शेख सलाऊद्दिन गाजी बाबा ऊरूस मैदानावर १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सभेमुळे तालुक्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. या सभेतून ऊर्जा घेत तालुक्यातील सत्ताधार्‍यांनी आजवर नगर परिषद आणि अन्य सर्व विकासकामांमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पुन्हा एकदा नव्या जोमाने एल्गार करण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज होणार असल्याचे शेडगे म्हणाले.

रोहे-येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे रायगडमधील उमेदवार अनंत गीते ( Mahavikas Aghadi candidate from Raigad Anant Gite) हेच असावेत असा आग्रह शरद पवार यांचा असल्याचा दावा करतानाच याच अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय रायगड जिल्हा दौर्‍यावर येत असल्याची माहिती ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, महिला आघाडी तालुका संघटक नीता हजारे, शहर महिला आघाडी प्रमुख समीक्षा बामणे, उप तालुकाप्रमुख महादेव साळवी, यतिन धुमाळ उपस्थित होते.

- Advertisement -

ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकारने रोहे शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला आहे. यासोबतच आधी आलेल्या निधीमधून शहरात झालेल्या सर्व विकासकामांमध्ये येथील सत्ताधार्‍यांनी निव्वळ भ्रष्टाचार केल्याचे त्यांनी सांगितले. या सभेला गीते यांच्यासह भास्कर जाधव, संजय राऊत, सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत.

नव्या जोमाने शिवसैनिक सज्ज-: उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यातील एक सभा शहरातील शेख सलाऊद्दिन गाजी बाबा ऊरूस मैदानावर १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सभेमुळे तालुक्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. या सभेतून ऊर्जा घेत तालुक्यातील सत्ताधार्‍यांनी आजवर नगर परिषद आणि अन्य सर्व विकासकामांमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध पुन्हा एकदा नव्या जोमाने एल्गार करण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज होणार असल्याचे शेडगे म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -