खोपोलीतील पेशवेकालीन विरेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने शिवभक्तांची मांदियाळी

  दगडाच्या चिरापासून बनविलेला पेशवेकालीन  शंकर मंदिर असून खोपोलीसह खालापूर तालुक्यातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान आहे.शनिवारी महाशिवरात्री निमित्त सकाळपासून भाविकांची अलोट गर्दी केली होती.प्रारंभी  शिवलिंगाची महापूजा सौ.वर्षा राजन गोयल,सौ.सुवर्णा संजय गुरव,सौ.किर्ती विरेंद्र महाडीक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी काकड आरती खोपोली काकड आरती उतेकर व नटेबुवा मंडळी का ह.भ.प दिनेश फाटक महाराज यांच्या हस्ते झाली. 

खोपोली:  दगडाच्या चिरापासून बनविलेला पेशवेकालीन  शंकर मंदिर असून खोपोलीसह खालापूर तालुक्यातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान आहे.शनिवारी महाशिवरात्री निमित्त सकाळपासून भाविकांची अलोट गर्दी केली होती.प्रारंभी  शिवलिंगाची महापूजा सौ.वर्षा राजन गोयल,सौ.सुवर्णा संजय गुरव,सौ.किर्ती विरेंद्र महाडीक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी काकड आरती खोपोली काकड आरती उतेकर व नटेबुवा मंडळी का ह.भ.प दिनेश फाटक महाराज यांच्या हस्ते झाली.

सायंकाळी चार वाजता श्री वीरेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक श्री शंकर मंदिर ते खालची खोपोली या दिंडी सह टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.मिवरवणुकीत विरेश्वर ढोलताशा पथक वरची खोपोली आणि चौक पंचक्रोशी दिंडी भजनी मंडळ सुर संगम यशवंत मिस्त्री, सनई वादन नंदकुमार सातारकर यांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन या मिरवणुकीची शोभा वाढवली.

       श्री वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ शंकर मंदिर वरची खोपोली अध्यक्ष शंकर मारुती पापळ , उपाध्यक्ष भास्कर लांडगे,शंकर गायकर,सेक्रेटरी विनायक तेलवणे,खजिनदार रामचंद्र कुडपाने सहखजिनदार  राहुल नटे, अजय कांबळे,सह सेक्रेटरी संजय गुरव,सदस्य बबन दाभाडे ,रवींद्र रांजणे ,रवींद्र साळुंखे ,साहिल सुर्वे,सल्लागार  दत्तात्रय मसुरकर ,लक्ष्मण साळुंखे, काशिनाथ जाधव, मनीष यादव ,संतोष कोळंबे ,गोविंद दाभाडे ,संदेश येवले ,संदीप सुर्वे ,विनोद राजपूत अशोक चांदगुडे यांनी उत्तम व्यवस्था केली होती.
      यावेळी खोपोली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या महाशिवरात्री निमित्ताने मंदिरासाठी मंडप डेकोरेशन व लाइटींग ची व्यवस्था सद्गुरु परम पूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराज आश्रम  कडून करण्यात आली होती. महाशिवरात्र उत्सवासाठी ज्या देणगीदारांनी मदत देऊन सहकार्य केले त्यांचे उत्सव कमिटी च्या सर्व पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहे.
  स्थानाला अन्यन्य साधारण महत्व
 रायगड जिल्हाचे शेवटची हद्द असलेल्या वरची खोपोली येथे दगडाच्या चिरयापासून बनविलेला पेशवेकालीन मंदीर असून मंदीराच्या बाजूला मोठा तलाव आहे या तलावातील पाण्यामुळेच संपूर्ण खोपोलीकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेला कोणतेही आडचण येत नाही. डोंगराच्या पायथ्थाशी तसेचteam शेजारीच प.पू.गगनगिरी महाराजांचे आश्रम असल्याने या निसर्गरम्य ठिकाणी मुंबई, डोंबिवली, ठाणे सह रायगड जिल्ह्यातील भाविक येत असून पेशवेकालीन शंकर मंदीरात अनेक हिंदी,मराठी चित्रपटाचे चित्रकरीन याठिकाणी झाले असल्याने या स्थानाला अन्यन्य साधारण महत्व आहे.गेली अनेक वर्ष विरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची खोपोलीचे सल्लागार माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,अध्यक्ष शंकर पापळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिवरात्री उत्सव संपन्न झाला.
श्री वीरेश्वर मंदिरात दर्शनाचा लाभ
    पहाटेपासूनच विविध भजन भक्तिगीत व अभंगाचा संगीतमय कार्यक्रम रवींद्र कुलकर्णी, प्रमोद चौधरी, संकटमोचन हनुमान प्रसादिक भजनी मंडळ, रेश्मा जोशी, भैरवनाथ महिला भजन मंडळ वरची खोपोली व वीरेश्वर भक्तीसंगम महिला भजन मंडळ ,मुक्ताई महिला भजन मंडळ वरची खोपोली ,यांच्या मंत्रमुग्ध भक्ती गीत भावगीत कार्यक्रमांनी श्री वीरेश्वर मंदिर दणाणून गेले होते.यावेळी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी,प्रशासक अनुप दुरे,खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शिरीष पवार, यांच्यासह विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी तसेच खोपोलीसह खालापूर तालुक्यातील शिवभक्तांनी श्री वीरेश्वर मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला.