घररायगडजेएसडब्लूकडून अधिग्रहीत केलेल्या जमिनींबाबत ३० मे पूर्वी बैठक

जेएसडब्लूकडून अधिग्रहीत केलेल्या जमिनींबाबत ३० मे पूर्वी बैठक

Subscribe

जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुरुड तालुक्यामधील जे.एस.डब्ल्यू ,साळाव कंपनीने येथील चेहेर,नवीन चेहेर,साळाव,मिठेखार,निडी, वाघुळवाडी परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांवर गेल्या सन १९८९ म्हणजेच ३३ वर्षांपासून होत असलेल्या अन्यायावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली होती. यावेळी आमच्या अधिग्रहित केलेल्या जमिनी आम्हाला परत द्यायची मागणी शेतकर्‍यांनी रेटून लावली असता अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा बैठकीचे अध्यक्ष सुनिल थोरवे यांनी शेतकर्‍यांचे सर्व प्रश्न आणि मागण्या ऐकून घेतल्यानंतर ३० मे पूर्वी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुढची बैठक लावण्यात येईल तसेच जेएसडब्ल्यू यांच्या वतीने निर्णय घेण्याची क्षमता असणारे अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य केली जाईल अशी घोषणा केली.

अलिबाग: जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुरुड तालुक्यामधील जे.एस.डब्ल्यू ,साळाव कंपनीने येथील चेहेर,नवीन चेहेर,साळाव,मिठेखार,निडी, वाघुळवाडी परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांवर गेल्या सन १९८९ म्हणजेच ३३ वर्षांपासून होत असलेल्या अन्यायावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली होती. यावेळी आमच्या अधिग्रहित केलेल्या जमिनी आम्हाला परत द्यायची मागणी शेतकर्‍यांनी रेटून लावली असता अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा बैठकीचे अध्यक्ष सुनिल थोरवे यांनी शेतकर्‍यांचे सर्व प्रश्न आणि मागण्या ऐकून घेतल्यानंतर ३० मे पूर्वी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुढची बैठक लावण्यात येईल तसेच जेएसडब्ल्यू यांच्या वतीने निर्णय घेण्याची क्षमता असणारे अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य केली जाईल अशी घोषणा केली. तर मे महिन्याच्या शेवटपर्यंत सदरील विषयावर निर्णय झाला नाही तर शेतकरी आपल्या अधिग्रहित केलेल्या जमिनीवर पुन्हा ताबा मिळवून यावर जून महिन्यापासून शेती कसण्यास सुरूवात करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अनुउपस्थितीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली राजस्व सभागृह येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्यासोबत निवासी जिल्हाधिकारी संजय शिर्के, प्रांत अधिकारी प्रशांत ढगे तसेच मुरुड तहसीलदार रोहन शिंदे उपस्थित होते.
एकूण ६०० एकर जागा संपादित करणे बाकी असून कंपनी गैरप्रकारे पत्र पाठवून दलालांच्या माध्यमातून नोकरीच्या बदल्यात तटपुंजे सानुग्रह रक्कम देण्याची घाई करीत असून त्याला सर्व शेतकर्‍यांचा विरोध आहे असेही बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले.या बैठकीला शेतकर्‍यांचे कायदेशीर प्रतिनिधी म्हणून रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, अ‍ॅड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे, अ‍ॅड. विनायक शेडगे व अजय चवरकर, अ‍ॅड. अक्षय गवळी राम सुतार, जितेंद्र गायकर, मंगेश गायकर, जनार्दन चवरकर, अरुण रोटकर, कुसुम मुंबईकर, दीपक नथुराम रोटकर आणि राजेंद्र सुतार यांचेसह एकशे पन्नास शेतकरी बैठकीत उपस्थित होते.

पार्श्वभूमी

- Advertisement -

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी सिकॉम करिता महाराष्ट्र शासनाने भूसंपादन करून भाडेपटट्याने घेतलेल्या जमिनीवर १९८९ मध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज यांचा विक्रम इस्पात हा प्रकल्प वेलस्पन मॅक्सस्टील लिमिटेड यांनी विकत घेतला होता तदनंतर हा कारखाना जेएसडब्लू स्टील लिमिटेड, साळाव या कंपनीने अधिग्रहित केला परंतू सुरवातीला वेलस्पन मॅक्सस्टील लिमिटेड व वरील जमीन मालक प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यामध्ये सन २०१० साली सामजंस्य करार करण्यात आला होता मात्र वर नमूद कारखानदाराने या करारामध्ये नमूद सर्व अटींचे वारंवार उल्लंघन करीत शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याने वरील गावांमधील २०१० चे १२६ शेतकरी व १९८९ चे ८६ शेतकऱ्यांवर गेल्या ३२ वर्षांपासून होत असलेल्या अन्यायामुळे अखेर आमच्या अधिग्रहित केलेल्या जमिनी आम्हाला परत द्यायची मागणी पुन्हा आजच्या बैठकीत शेतकऱ्यांनी रेटून लावली. दिनांक २८ मार्च,२०२३ जेएसडब्लू च्या उपाध्यक्ष श्री.रॉय यांच्यापत्रानुसार कंपनी ही जिल्हाधिकारी व शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे असे बैठकीत शेतकऱ्यांनाकडून सांगण्यात आले. एकूण ६०० एकर जागा संपादित करणे बाकी असून कंपनी गैरप्रकारे पत्र पाठवून दलालांच्या माध्यमातून  नोकरीच्या बदल्यात तटपुंजे सानुग्रह रक्कम देण्याची घाई करीत असून त्याला सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे असेही आजच्या बैठकीत  अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -