घररायगडउरणमधील युवानेते मेघनाथ म्हात्रे यांचे निधन

उरणमधील युवानेते मेघनाथ म्हात्रे यांचे निधन

Subscribe

युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड

जासई विभागीय भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवारी २५ रोजी निधन झाले. मेघनाथ म्हात्रे हे जासई परिसरातील भाजपचे उमदे नेतृत्व समजले जाणारे नेते होते. युवा नेतृत्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मेघनाथ म्हात्रे यांच्या पार्थिवावर जासई गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मेघनाथ म्हात्रे हे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचे ते निकटवर्ती होते. त्यांनी विभागात भाजपा पक्ष मोठा करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. मेघनाथ म्हात्रे यांच्या अंत्यविधीसाठी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, यांच्यासह उरण तालुका भाजपा अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा ओ बी सी सेल अध्यक्ष चंद्रकांत घरत, भाजपा वाहतूक सेल जिल्हा अध्यक्ष सुधिर घरत, कामगार नेते सुरेश पाटील, भाजपा उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, भाजपा पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष पंडीत घरत, व पंचक्रोशीतील भाजपा कार्यकर्ते, जासई ग्रामस्थ, मित्र परिवार, मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यासाठी उभारलेल्या आंदोलनात मेघनाथ म्हात्रे यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. गेले काही दिवस त्यांच्यावर मुबंई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. जासईचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रात मेघनाथ म्हात्रे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या निधनाने आमचा एक ताकदीचा युवा नेतृत्व हरपला आहे असे, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वक्तव्य केले.

- Advertisement -

हेही वाचा – अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने धोका कमी झाला, विजय वडेट्टीवार यांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -