घररायगडमहडच्या अष्टविनायक मंदिरात रांगोळीतून वृक्ष संवर्धनांचा संदेश

महडच्या अष्टविनायक मंदिरात रांगोळीतून वृक्ष संवर्धनांचा संदेश

Subscribe

रांगोळी काढण्यासाठी १०० किलो कणीचा वापर करण्यात आला. तसेच रांगोळीसाठी अर्थसहाय्य यशवंत सिन्हा चुडासमा (अहमदाबाद) यांनी केले. ही रांगोळी रेखाटण्यासाठी ४८तास एवढा कालावधी लागला. कणी, साबुदाणे,काळे तिळ,यांचा वापर करण्यात आला.

गणपती उत्सव हा मराठी महिन्यातील माघ महिन्यात येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव साजरा करण्यात येतो. विशेष करून महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायक मंदिरात भाविक भक्ताची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने वरद विनायाकाचे दर्शन घेण्यासाठी याठीकाणी असंख्य भक्तगण येत असतात. मुंबई -पुणे महामार्गावर असलेले अष्टविनायकापैकी महड गावातील वरद विनायक गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

माघी गणपती उत्सवाच्या निमित्ताने महड येथे किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या सुमधुर वाणीमधून हर्षद महाराज जोगळेकर यांनी सुंदर असे माघी गणपत्ती उत्सव यावर आपले विचार किर्तनांच्या माध्यमातून सांगितले. यावेळी भव्य दिव्य अशी रांगोळी वरद विनायक फुल रांगोळी मंडळयांनी साकारली होती.रांगोळीचे सुंदर असे दृश्य भक्तगणांचे लक्ष वेधत असल्याने ते अनेकजण मोबाइलमध्ये टिपण्याचा प्रयत्न करीत होते. ही सुंदर रांगोळी रवि आचार्य नेरळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश देशमुख, सचिन पाटील, तुळशिराम ठोंबरे, टेंभरी, साक्षी देशमुख,कविता देशमुख, वंदना देशमुख,लीना पाटील तसेच व्यवस्थापक अतुल तट्टू आदी कलाकारांनी साकारली असल्याने सर्व कलाकारांचे कौतुक होत आहे.

- Advertisement -

रांगोळी काढण्यासाठी १०० किलो कणीचा वापर करण्यात आला. तसेच रांगोळीसाठी अर्थसहाय्य यशवंत सिन्हा चुडासमा (अहमदाबाद) यांनी केले. ही रांगोळी रेखाटण्यासाठी ४८तास एवढा कालावधी लागला. कणी, साबुदाणे,काळे तिळ,यांचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर विविध रंग वापरण्यात आले.यामध्ये तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा,जांभळा आदी रंगाचा वापर करण्यात आला. रांगोळीच्या माध्यमातून झाडे जगवा त्यांना नष्ट करु नका असा संदेश देण्यात आला.

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा

- Advertisement -

अष्टविनायक देवस्थानांपैकी एक पालीतील श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव व श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व अटी शर्थीचे पालन करून विधान धार्मिक कार्यक्रम व विधी करण्यात आले. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे पासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

जन्मोत्सवाला बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून भक्तिभावाने पाळणा हलविण्यात आला. जन्म सोहळ्याच्या कीर्तनास व इतर कार्यक्रमात फक्त ५० भाविक उपस्थित होते. बल्लाळेश्वर मंदिर व परिसरात रोषणाई, रांगोळी व सजावट करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रा आणि धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. परिणामी उत्सवात यावर्षी रस्त्यावर फक्त छोटी खेळण्यांची व इतर छोटी दुकाने लागली होती. तसेच काही विक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले व मिठाईवाले होते.यावर्षी श्री गणेशाची पालखी देखील कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने गाडीतून निघाली. तसेच पालखी रस्त्यात कोठेही थांबली नाही. लोकांना पालखीला न ओवाळता फक्त नमस्कार करण्यास सांगण्यात आले होते. भाविकांसाठी महाप्रसाद झाला नाही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -