घररायगडराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरने सुवर्णपदक पटकावले

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरने सुवर्णपदक पटकावले

Subscribe

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार मिहिरचा सत्कार करण्यात आला.

नॅशनल युथ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एज्युकेशन फेडरेशन इंडियाच्या वतीने नॅशनल युथ गेम्स चॅम्पिशियन २०२१ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी याने बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मिहीरचा सत्कार करण्यात आला. मिहीर हा सीकेटी महाविद्यालयाचा टीवायबीकॉमचा विद्यार्थी आहे. शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात त्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. म्हणूनच या सुवर्ण कामगिरीबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्‍हाटे, पुणे विद्या भवनचे प्रा. दीपक निचित यांच्यासह अनेक मान्यवरांनी मिहीरचे अभिनंदन केले.

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया, फिट इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ एमवायएएस यांच्या वतीने गोवा येथील नेहरू स्टेडियममध्ये तिसर्‍या नॅशनल युथ गेम्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. यातील बॅडमिंटन स्पर्धेत २० वर्षाखालील एकेरी गटात मिहीर परदेशी याने उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. त्याच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आणि त्याने सुवर्णपदक पटकावले.

- Advertisement -

टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली

यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकली होती, जी भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा मात्र भारत पदकांची दुहेरी संख्या गाठेल अशी अपेक्षा केली जात आहे. भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकची दमदार सुरुवात झाली असून स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकांचे खाते उघडले. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली.


हेही वाचा – महाराष्ट्र आपत्तीत, शोकाकुल, माझा वाढदिवस साजरा करु नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -