घररायगडरायगड जिल्ह्यातील निसर्ग, वन पर्यटनाची कामे सुरु करणार; वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे...

रायगड जिल्ह्यातील निसर्ग, वन पर्यटनाची कामे सुरु करणार; वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

Subscribe

यावेळी  पर्यटन राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या की, पर्यटन समृद्ध रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळे ही वन विभागांतर्गत येतात. या पर्यटन स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती आणि  प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील (Raigad district) निसर्ग आणि वन पर्यटनाची (nature and forest tourism) प्रलंबित कामे तत्काळ सुरू करण्याची ग्वाही वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister Dattatraya Bharane) यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना बुधवारी बैठकीत दिली. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य,फणसाड वन्यजीव  अभयारण्य आणि  देवकुंड धबधबा  येथे पर्यटन विषयक विकास कामांसाठी आयोजित बैठकीत दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी या बैठकीला पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, अतिरिक्त  प्रधान मुख्यवनसरंक्षक बेंझ, पर्यटन संचालक धनंजय सावळकर, दूरदृश्यप्रणालीव्दारे इको टुरिजमचे प्रधानमुख्य वनसंरक्षक गुप्ता, उपवनसंरक्षक सरोज गवस बैठकीला उपस्थित होते.

यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले, पर्यटनाच्या अनेक संधी असलेल्या रायगड जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यांसह पर्यटकांचे विशेष आकर्षणाची ठिकाणे असलेली कर्नाळा पक्षी अभयारण्य ( Karnala Bird Sanctuary), फणसाड वन्यजीव अभयारण (Phansad Wildlife Sanctuary), देवकुंड धबधबा (Devkund Falls), घारापुरी लेणी ( Gharapuri Caves), डॉ. सी.डी. देशमुख जैवविविधता उद्यान (Dr. C.D. Deshmukh Biodiversity Park) आदी स्थळांचा विकास प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत करण्यात येत आहे. वन विभागाच्या निकषानुसार मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या कामांचे प्रस्ताव इको टूरिझम बोर्डास तात्काळ सादर करावेत.

- Advertisement -

वन विभागाने प्रलंबित कामे प्राधान्याने करावीत – आदिती तटकरे
यावेळी  पर्यटन राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या की, पर्यटन समृद्ध रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळे ही वन विभागांतर्गत येतात. या पर्यटन स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती आणि  प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील ही विकासकामे निधीची उपलब्धता असतांना तात्काळ व्हावीत. सर्व आवश्यक पूर्ततांसह प्रस्ताव विभागाने इको टूरिझम बोर्डास सादर करून सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -