Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर रायगड आमदार भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाची चर्चा; पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली ग्वाही

आमदार भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाची चर्चा; पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली ग्वाही

Subscribe

किल्ले रायगडावर ‘हर घर सावरकर’ समितीच्या वतीने हर घर सावरकर या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रारंभ कार्यक्रमात उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भरत गोगावले लवकरच मंत्री होतील याची ग्वाही दिली. यामुळे महाड माणगाव पोलादपूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

महाड: किल्ले रायगडावर ‘हर घर सावरकर’ समितीच्या वतीने हर घर सावरकर या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रारंभ कार्यक्रमात उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भरत गोगावले लवकरच मंत्री होतील याची ग्वाही दिली. यामुळे महाड माणगाव पोलादपूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
हर घर सावरकर समितीतर्फे हर घर सावरकर हे अभियान किल्ले रायगडावरून सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ किल्ले रायगडावर रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. हर घर सावरकर अभियानाच्या प्रारंभ कार्यक्रमात आमदार गोगावले, सचिन जोशी, देवव्रत बापट आणि गाणव हे उपस्थित होते, यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत त्यांनी हर घर सावरकर अभियानाचा प्रारंभ किल्ले रायगडावरून होतोय ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमात सामंत यांनी गोगावले यांच्या मंत्री पदाचीच अधिक चर्चा केली. मी तात्पुरता पालकमंत्री असून खरे पालकमंत्री हे भरत गोगावलेच आहेत, यामुळे येत्या काही दिवसातच गोगावले मंत्री होतील असे सूतोवाच केले. सामंत यांनी या अभियानाचा प्रारंभ करत २ जून आणि ६जून रोजी होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची देखील पाहणी देखील केली.
महाड – माणगाव – पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोगावले हे सन २००९ पासून विधानसभा सदस्य पदी निवडून येत आहेत.

गोगावले यांची तिसरी टर्म
गोगावले यांची ही तिसरी टर्म असून मध्येच स्थापन झालेल्या आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंकडून भरत गोगावले यांना मंत्री पद मिळेल अशी आशा संपूर्ण महाडकारांना होती मात्र या ठिकाणी सुनील तटकरे यांनी आपले वजन वापरत त्यांची कन्या आदिती तटकरे यांना मंत्रीपद देत जिल्ह्याचे पालकमंत्री बनवले. यावरून गोगावले आणि त्यांची समर्थक प्रचंड नाराज होते. आमदार गोगावले यांनी जिल्ह्यातील तीन आमदारांना घेऊन या विरोधात बंडही केले. पालकमंत्री हटाव अशी जाहीर घोषणा देखील त्यांनी अनेक वेळा केली त्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. यामुळे आघाडी सरकार कोसळले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले.

- Advertisement -

कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
मुख्यमंत्री शिंदे यांचे अतिशय निकटचे संबंध असलेले आमदार गोगावले यांची ओळख आहे. यामुळे गोगावले हे शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात तरी मंत्री होतील अशी आशा होती, मात्र सुरुवातीच्या मंत्रिमंडळ स्थापनेत गोगावले यांची वर्णी लागली नाही. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गोगावले यांना मंत्रीपद नक्की मिळेल या आशेवर महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे रायगडावर नामदार सामंत यांनी केलेल्या चर्चेमुळे भरत गोगावले आता मंत्री होतील या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आमदार गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -