घररायगडपनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

Subscribe

भारतीय जनता पक्ष अणि सर्व घटकांचा विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत.तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालीदेवद हद्दीत विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला.

पनवेल: भारतीय जनता पक्ष अणि सर्व घटकांचा विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत.तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालीदेवद हद्दीत विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य अमित जाधव, बॉम्बे राऊंड टेबल १९चे चेअरमन विनय महेश्वरी, उद्योजक विनय अग्रवाल, पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, भाजप पालीदेवद जि. प. अध्यक्ष किशोर सुरते, सरपंच योगिता राजेश पाटील, उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच आलुराम केणी, बुवाशेठ भगत, अशोकशेठ पाटील, भाजप सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, सरचिटणीस उदय म्हस्कर, पालीदेवद ग्रामपंचायतीचे सदस्य महेश पाटील, पुष्पा म्हस्कर, अनिता पाटील, चेतन केणी, युवा नेता प्रमोद भगत, रवींद्र केणी, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष महेश केणी, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील, ग्रामविकास अधिकारी सुदीन पाटील, भाजप महिला मोर्चा तालुका चिटणीस प्रिया वाघमारे, हनुमंत खुटले आदी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

गटार बांधकाम व दुरुस्ती करणे

- Advertisement -

पालीदेवद (सुकापूर) ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक ४ येथे जिल्हा परिषद मराठी शाळेचे बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक ६ येथे शासनाच्या जनसुविधा योजनेंतर्गत १८ लाख नऊ हजार ९२९ रुपयांच्या निधीतून डंपिंग ग्राऊंड येथे घनकचरा व्यवस्थापन करणे, याच प्रभागात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२२-२३च्या आठ लाख ५० हजार रुपयांच्या निधीतून विमलवाडी अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक २ येथे १५वा वित्त आयोगनुसार सात लाख आठ हजार ४०१ रुपयांच्या निधीतून कांडपिळे पेट्रोल पंप ते घाटी आळीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, याच प्रभागात १५वा वित्त आयोगनुसार सात लाख ५३ हजार ७८३ रुपयांच्या निधीतून भगतवाडी येथील प्रेमनगरी बैठक हॉल ते एक्सप्रेस हायवेपर्यंत अंतर्गत गटार बांधकाम करणे.

गटार बांधकाम व दुरुस्ती करणे

- Advertisement -

प्रभाग क्रमांक ५ येथे १५वा वित्त आयोगनुसार सात लाख रुपयांच्या निधीतून सिंडीकेट बँक ते गोकुळधाम सोसायटीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, प्रभाग क्रमांक ४ येथे १५वा वित्त आयोगनुसार चार लाख रुपयांच्या निधीतून नामदेव पोपेटा ते जगदीश पोपेटा घर अंतर्गत गटार बांधकाम व दुरुस्ती करणे, याच प्रभागात १५वा वित्त आयोगनुसारचार लाख रुपयांच्या निधीतून जयवंत पोपेटा ते रामदास पोपेटा घरापर्यंत गटार बांधकाम व दुरुस्ती करणे, प्रभाग क्रमांक १ येथे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२२-२३च्या १० लाख रुपयांच्या निधीतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे. या सर्व विकास कामांचे भूमिपूजन महाशिवरात्रीचे औचित्य साधून करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -