घररायगडकर्जत तालुक्यातील मोहिली पुलाची तातडीने दुरुस्ती होणार - सुधाकर घारे

कर्जत तालुक्यातील मोहिली पुलाची तातडीने दुरुस्ती होणार – सुधाकर घारे

Subscribe

पुलाचा काही भाग उल्हास नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याने वाहून गेला आहे.

कर्जत तालुक्यातील उल्हासनदीवर मोहिली-आडोशी गावांना जोडणारा मोहिली पूल महापुराच्या पाण्याने शितिग्रस्त झाला आहे. त्या पुलाची पाहणी केल्यानंतर पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागाला रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिल्या आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात दुर्घटना घडल्या आहेत. वासरे भागात मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बीड सारखे मोठे गाव असलेल्या भागत जाण्यासाठी मोहिली पूल अत्यंत महत्वाचा आहे. पुलाचा काही भाग उल्हास नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. या पुलावरून २१ जुलैच्या मध्यरात्रीपासून सकाळ पर्यंत उल्हासनदीला आलेल्या महापूराचे पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असल्याने या भागातील गावांचा संपर्क थांबला होता. त्यामुळे याच भागात राहणारे रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मोहिली पुलाची पाहणी केली.पुलाचा काही भाग वाहून गेल्याने तातडीने पुलाची दुरुस्ती झाली पाहिजे, अशा सुचना दिल्या. सुधाकर घारे यांनी मोहिली पुलाची पाहणी करताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता गोपणे यांना पुलाच्या दुरुस्तीबाबत सुचना दिल्या.

याशिवाय मोहिली पुलावरून आजूबाजूच्या ४० हून अधिक गावातील लोक मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी जात असतात.त्यात कोविड लसीकरण देखील सध्या सुरू आहे. त्यामुळे पूल वाहतुकीस बंद झाल्यास रुग्ण आणि लसीकरण घेण्यासाठी येणारे यांची मोठी गैरसोय होऊ शकते.त्यामुळे तातडीने पुलाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी बीड ग्रामपंचायतच्या सरपंच प्रभावती लोभी यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Taliye Landslide : तुम्ही स्वतःला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -