घररायगडमोर्बे धरणग्रस्तांनी उपोषणाचे हत्यार उपसले

मोर्बे धरणग्रस्तांनी उपोषणाचे हत्यार उपसले

Subscribe

न्याय्य हक्कांसाठी अनेक वर्षे लढा

चौक-: गेले अनेक वर्षे आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणार्‍या मोर्बे धरणग्रस्तांना अखेर उपोषणाचे हत्यार उपसावे लागले असून, कोकण आयुक्तांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याबाबातचे पत्र देण्यात आले आहे. (Morbe dam victims take up weapons of hunger strike) मंगळवारी कृती समिती आणि धरण प्रकल्पग्रस्त यांच्या झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्बत झाले आहे.

३४ वर्षे धरणग्रस्त कृती समिती न्याय्य हक्कांसाठी पाठपुरावा करीत असताना त्यांच्या मागण्यांना नेहमीच केराची टोपली दाखवली गेली आहे. करोडो रुपयांची जमीन शेकड्यात घेऊन शेती ते नोकरीच्या उत्पन्नापासून दूर ठेवण्यात आले आहे. शेकडो तरुण प्रकल्पग्रस्त दाखलाधारक असून, त्यांना नोकरी नाही. संपादन करून वापरात न घेतलेली जमीन कसण्यासाठी द्यावी, अशीही मागणी केली गेली आहे. तर जमीन संपादन करताना रेडिरेकनरचा विचार न करता शेकडा रुपये दर देऊन बोळवण केली आहे.

- Advertisement -

मोर्बे धरण आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे झाले आहे. आम्ही राज्य सरकारकडून धरण विकत घेतल्याचे पालिकेचे म्हणणे आहे, तर तुमचे सर्व प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेकडून सोडून घ्या, असे राज्य सरकार सांगते. याबाबत संबंधित अधिकारी, मंत्री यांच्याकडे बैठका झाल्या, पत्रव्यवहारही झाले. शेवटी १२ डिसेंबर २०२३ रोजी कोकण आयुक्तांच्या कार्यालयासमोर राजाराम पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करण्यात आला असून, मोर्बे धरणग्रस्त कृती समिती अध्यक्ष जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष परशुराम मिरकुटे यांनी उपोषणाचे पत्र दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -