घररायगडरस्ते, मैदानांची झाली कचराकुंडी; कचर्‍याची योग्य विल्हेवाट नसल्याने आरोग्य धोक्यात

रस्ते, मैदानांची झाली कचराकुंडी; कचर्‍याची योग्य विल्हेवाट नसल्याने आरोग्य धोक्यात

Subscribe

जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडे डंपिंग ग्राऊंड नसून, या ग्रामपंचायतींकडे कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पांचाहीअभाव आहे. यामुळे शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही कचर्‍याच्या समस्येने डोके वर काढले आहे. जमा करण्यात आलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्न आता ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनाही भेडसावत आहे.

रायगड जिल्ह्यातील रस्ते व मैदानांची कचराकुंडी झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडे डंपिंग ग्राऊंड नसल्याने ग्रामपंचायती जमा केलेला कचरा गावाबाहेरील रस्त्यांवर, मैदानांमध्ये तसेच गाव हद्दीतील एखाद्या मोकळ्या जागी जमा करीत आहेत. जमा केलेल्या कचर्‍याची योग्य रितीने विल्हेवाट लावली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियानालाही गालबोट लागत आहे.

जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडे डंपिंग ग्राऊंड नसून, या ग्रामपंचायतींकडे कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पांचाहीअभाव आहे. यामुळे शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही कचर्‍याच्या समस्येने डोके वर काढले आहे. जमा करण्यात आलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्न आता ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनाही भेडसावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आवाहन केल्यानंतर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत स्वच्छ भारत अभियानास सुरुवात झाली. या अभियानात मान्यवरांपासून, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्व स्तरांतील लोकांनी सहभाग घेतला. हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला. ते यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. परंतु असे अभियान राबवत असताना जमा करण्यात आलेला कचरा टाकायचा कोठे, असा प्रश्न निर्माण झाला.

- Advertisement -

जसे मोठ्या शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यावरून वाद होऊ लागले, तसेच ओला व सुका असा कचरा वेगवेगळी प्रतवारी करून त्यावर प्रक्रिया करणे, तो सर्व कचरा टाकण्याची जागा निश्चित करणे यावरुन ग्रामीण भागातही वाद होऊ लागले. वेळीच या समस्येकडे लक्ष देऊन योग्य उपाय योजना करुन ग्रामपंचायती सधन बनवून ग्रामपंचायतीसाठी नियोजनबद्ध योग्य असा कचरा व्यवस्थापन व कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आराखडा तयार करणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायतींकडे कचर्‍यावर प्रक्रीया करणारी यंत्रणा नसल्याने ग्रामपंचायती जमा केलेला कचरा जाळून कचरा नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. तसेच जाळण्यात आलेल्या कचर्‍याच्या धुरामुळे नागरिकांमध्ये दम्याचे तसेच इतर आजार वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कचर्‍याच्या दुर्गंधीमुळेही साथीचे आजार फैलावण्याचा धोका आहे.

- Advertisement -

कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रशिक्षित कामगारांबरोबरच योग्य आर्थिक पाठबळाची गरज आहे. जेणेकरून स्वच्छता अभियानामुळे नागरिकांना जी स्वच्छतेची सवय लागली ती पुढील काळातही तशीच चालू राहील. कचर्‍याची ग्रामपंचायतीकडून योग्य विल्हेवाट लावल्यास गावठाणाबरोबरच वाड्या आणि वस्त्यांवरील लोकांचेही आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -