Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर रायगड रायगडावर विद्युत रोषणाई , खासदार संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याला खडसावले

रायगडावर विद्युत रोषणाई , खासदार संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याला खडसावले

विद्युत रोषणाईवरुन पुरातत्व खात्यासाठी हा काळा दिवस असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे अराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज(१९ फेब्रुवारी) जयंती साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यातील सर्व गडकोटांना सजवण्यात आले आहे. अनेक किल्ल्यांवर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावरही पुरातत्व खात्याने विद्युत रोषणाई केली आहे. परंतु या विद्युत रोषणाईवरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुरात्तव विभागाला चांगलेच खडसावले आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सभोवताली रंगीबेरंगी विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्युत रोषणाईवरुन पुरातत्व खात्यासाठी हा काळा दिवस असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवजयंतीपूर्वीच पुरातत्व विभागाला खडसावले आहे त्यामुळे कारवाई होण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत रायगडावर केलेल्या विद्युत रोषणाईवर नाराजी व्यक्त केल आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल.

- Advertisement -

त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो. अशा शब्दांत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

रायगडावर शिवजयंतीसाठी पर्यटकांना आणि शिवभक्तांना निशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. २ दिवस निशुल्क प्रवेश देण्यात आला असून २४ तास प्रवेश दिला गेला आहे. राज्यात कोरोना संकटानंतर प्रथमच शिवजयंती साजरी केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीवर अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

- Advertisement -