Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर रायगड खटके उडणे थांबता थांबेना; महावितरण कर्मचारी-ग्राहक वादावादी

खटके उडणे थांबता थांबेना; महावितरण कर्मचारी-ग्राहक वादावादी

तालुक्यात वावोशी येथे महावितरण कर्मचार्‍यांना महिलेने भर कार्यालयात केलेल्या मारहाणाची घटना ताजी असताना थकित वीज बिलावरून पुन्हा ग्राहक आणि महावितरण महिला कर्मचारी यांच्यात सार्वजनिक ठिकाणी मोठा वादंग झाला.

Related Story

- Advertisement -

तालुक्यात वावोशी येथे महावितरण कर्मचार्‍यांना महिलेने भर कार्यालयात केलेल्या मारहाणाची घटना ताजी असताना थकित वीज बिलावरून पुन्हा ग्राहक आणि महावितरण महिला कर्मचारी यांच्यात सार्वजनिक ठिकाणी मोठा वादंग झाला. हा प्रकार पनवेल येथील अधिकार्‍यासमोर झाला. महावितरण विभागाला खालापूर हद्दीत सुरळीत वीज पुरवठा करण्यात यश येत नसले तरी थकित वीज बिल वसुली मात्र जोरात सुरू आहे. एक महिन्याचे वीज बिल बाकी असेल तरी महावितरणचे कर्मचारी थेट ग्राहकाच्या दारात पोहचत असून, बिलासाठी तगादा लावत आहेत. बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

असे प्रकार घडू नयेत यासाठी महिला कर्मचारी गणवेशात आणि त्यांच्याजवळ ओळखपत्र असेल याबाबत सूचना करू. तसेच वाद टाळावे यासाठी तक्रार निवारण शिबीर लवकरच घेणार आहोत.
– व्ही. व्ही. गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग, खालापूर

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी महावितरणची येथील महिला कर्मचारी बस स्थानक परिसरात असलेल्या व्यावसायिकाकडे थकित बिलासंदर्भात गेली होती. त्यावेळी पनवेलच्या महावितरण विभागाचे अधिकारी देखील हजर होते. बिलाच्या तक्रारीवरून व्यावसायिक आणि महिला कर्मचारी यांच्यामध्ये सुरू झालेले भांडण विकोपाला जात एकमेकाला शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत मजल गेली. प्रकरण हाणामारीपर्यंत जाण्याची वेळ आली होती. सुदैवाने अधिकारी असल्यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु सार्वजनिक ठिकाणी झालेल्या वादामुळे बिल वसुली मुद्दा कळीचा ठरणार आहे.

काही महावितरण कर्मचारी गणवेशात नसतात, तसेच ओळखपत्रही जवळ बाळगत नाहीत. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. महिला कर्मचार्‍यांनी देखील नियमाचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा कटू प्रसंग घडतात.
– प्रशांत पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ता, माडप-खालापूर

हेही वाचा –

- Advertisement -

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

- Advertisement -