घररायगडमहावितरणचा वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीचा शॉक, मासिक बिलासोबत स्वतंत्र सुरक्षा ठेवीचे बिल

महावितरणचा वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीचा शॉक, मासिक बिलासोबत स्वतंत्र सुरक्षा ठेवीचे बिल

Subscribe

वीज वितरण कंपनीने पाठवलेल्या मासिक बिलात याचा कसलाच उल्लेखच नाही. ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या सरासरी बिलाऐवजी दोन महिन्यांच्या सरासरी बिलांची रक्कम महावितरणकडे जमा करावी लागणार आहे.

महावितरण वीज मंडळाने वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील पाठवून भर उन्हाळ्यात सामान्य ग्राहकांना शॉक दिला आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेवींच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये वीज ग्राहकांच्या खिशातून वसूल केले जातील असा अंदाज आहे.वीज ग्राहकांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी पसरली असून लोकप्रतिनिधींनी याकडे झोळेझाक केली असल्याचे दिसत आहे.

सहा महिन्यात ही सुरक्षा ठेव हप्त्यांमध्ये भरायची आहे. वीज वितरण कंपनीने पाठवलेल्या मासिक बिलात याचा कसलाच उल्लेखच नाही. ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या सरासरी बिलाऐवजी दोन महिन्यांच्या सरासरी बिलांची रक्कम महावितरणकडे जमा करावी लागणार आहे. सहा महिन्यात ही सुरक्षा ठेव भरायची आहे. कंपनीने मासिक बिलासोबत ४०० रुपयांचे स्वतंत्र सुरक्षा अनामतीचे बिल धाडल्याने वीज ग्राहक हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीने वीजपुरवठा सेवेच्या सुधारित तरतुदी राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केल्या. वीजबिल भरण्यास २१ दिवसांची मुदत दिली जाते. त्यानंतर बिल न भरल्यास १५ दिवसांची नोटीस द्यावी लागते. यासाठी एका महिन्याहून जास्त कालावधी लागत असल्याने दोन महिन्यांच्या सरासरी बिलाएवढी सुरक्षा रक्कम जमा करण्याचे ठरले होते.

- Advertisement -

बिलांच्या सरासरीचे गणित तयार केले गेले आहे. गेल्या वर्षी त्याच महिन्यातील वीजबिल किंवा गेल्या तीन महिन्यांमधील वीजबिल यापैकी जास्त असलेले बिल सरासरी म्हणून काढली गेली. याच्या दुप्पट रक्कम सुरक्षा ठेव ठेवायची आहे. काही ग्राहकांना दहा हजारांच्या पुढे पैसे जमा करावे लागतील.

रीडिंग घेण्यापासून ते देयके येईपर्यंत दोन महिन्याचा कालावधी निघून जातो. अनेक ग्राहकांना विलंबाने देयके येतात. ती विलंब आकारासह भरतात. त्यामुळे ग्राहकाला विलंब आकार भरावा लागतो. त्यातच आता एका ऐवजी दोन महिन्याची सुरक्षा ठेव घेण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक घरगुती वीज वापर ग्राहकाला दोन महिन्याची सुरक्षा ठेव या महिन्यात भरावी लागेल. सुरक्षा ठेव रक्कम १७ मे पूर्वी भरणा करावीत असा तोंडी फतवा काढलेला आहे. आधीच भर उन्हाळ्यात लोडशेडींगमुळे हैराण झालेल्या सामान्य वीज ग्राहकाला महावितरण कंपनीने जोराचा शॉक देत गलितगात्र केले आहे. तर जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मात्र मुग गिळून गप्प असल्याने वीज ग्राहक संताप व्यक्त करताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -