घररायगडलॉकडाऊनसह मुसळधार पावसाचाही मुरुड एसटी आगाराला फटका

लॉकडाऊनसह मुसळधार पावसाचाही मुरुड एसटी आगाराला फटका

Subscribe

सध्या रोजचे 3 लाख रुपयांचे उत्पन्न घटत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुसळधार पाऊस आणि काशीद पूल दुर्घटनेमुळे मुरुड-अलिबाग रस्ता वाहतुकीस बंद झाल्यानंतर एसटी प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुरुड एसटी आगाराला पाऊस आणि कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल २४ लाख रुपयांचा फटका बसला आहे. तसेच सध्या रोजचे ३ लाख रुपयांचे उत्पन्न घटत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सुनील वाकचौरे यांनी दिली. मुरुड आगरातून एसटीच्या एकूण २९ फेऱ्या असतात.  पावसामुळे बोरिवली, मुंबई, रोहे अशा १० फेऱ्या या सुरू आहेत. स्वारगेट-पुणे येथील फेरीमध्ये खूप नुकसान सोसावे लागले आहे. फक्त मुंबई, बोरिवली या फेऱ्यांमधून लाख ते सव्वा लाख उत्पन्न मिळते. एरव्ही आगराचे रोजचे उत्पन्न ४ ते ५ लाखाच्या आसपास आहे. लॉकडाऊनमध्ये एप्रिलपासून आगाराला सुमारे २४ लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती वाकचौरे यांनी दिली.

‘या’ मार्गाने बस सेवा सुरु

काशीद मार्गे पूल पडल्याने सर्व बसेस भालगाव, रोहा मार्गे मुंबईकडे सोडल्या जात आहेत. पुणे, महाड थेट बस सेवा रद्द करण्यात आली आहे. अलिबागकडे जाण्यासाठी वडखळ मार्गे ६० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. गेल्या आठवड्यापासून फक्त भालगाव मार्गे सेवा रोहे किंवा प्रवासी उपलब्ध झाल्यास मुंबईकडे सुरू करण्यात आली आहे. सुपेगाव किंवा बोर्लीमार्गे सेवा बंद आहे. मंगळवारी फारसे प्रवाशी नसल्याने रोह्याकडे जाणाऱ्या दोन ते तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

- Advertisement -

दररोज मिळणारे चार ते साडेचार लाखांचे उत्पन्न सध्या जेमतेम 1 लाख रुपयांवर आले आहे. अतिवृष्टीमुळे प्रवासी प्रवास करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे पुरेसे प्रवासी उपलब्ध होत नाहीत. परिणामी 7 ते 10 इतक्याच बस फेर्या परिस्थिती प्रमाणे सुरु ठेवल्या असून, अन्य बसेस आगारात उभ्या आहेत.


हेही वाचा – Satara Landslide: सातारा आंबेघर गावात ४ घरांवर दरड, १२ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -