घररायगडनैना प्रकल्प हद्दपार करा, शेतकरी संतापले!

नैना प्रकल्प हद्दपार करा, शेतकरी संतापले!

Subscribe

नैना प्रकल्प आम्हाला नकोच, आमच्या जमिनी फुकट घेणार्‍या नैनाला आमचा विरोध आहे, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनात या आंदोलनाची सरकारला दखल नक्कीच घ्यावी लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पनवेल-: तालुक्यात २३ गावांमध्ये (Naina Against strike of farmers In Panvel Taluka) येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचा विरोध होत असून, हा प्रकल्प तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी शेतकर्‍यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे. या उपोषणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. यावेळी अनिल ढवळे, दमयंती भगत, जयराम कडू, मधुकर पाटील, समीर पारधी, रवींद्र गायकर उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर अनेक शेतकरी यात सहभागी होणार आहेत.

प्रकल्पबाधित शेतकर्‍यांचा नैना विरोधी सूर कायम आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मानगुटावर नैना नावाची मोठी राक्षशीण बसली असून, तिचा नाश करायचा आहे, तिला तालुक्यातून हद्दपार करायचे असल्याचा ठाम निर्धार शेतकर्‍यांनी केला आहे. नैना प्रकल्पामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून, या प्रकल्पाला शेतकर्‍यांचा ठाम विरोध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, काशीनाथ पाटील, जी.आर.पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, अ‍ॅड. सुरेश ठाकूर, राजेश केणी, शेखर शेळके, सुदाम पाटील, वामन शेळके, नामदेव फडके, सुभाष भोपी, विश्वास पेटकर, बाळाराम फडके, विलास फडके यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

  • ग्रामस्थांचे अधिकार सिडकोच्या घशात                                                                                    नैनाच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने भूखंड वाटप, शासकीय, निमशासकीय, गुरचरण, गायरान, ग्रामपंचायत, तसेच गावकीच्या मालकीच्या जागा, इतर शासकिय जागा आणि सामाजिक जागा चुकीच्या पद्धतीने सरकार सिडकोच्या घशात घालून स्थानिक ग्रामस्थांचे अधिकार हिसकावून घेत आहे.
  • शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष                                                                              शेतकरी बांधकाम व्यवसायिक आणि ग्रामस्थ यांना प्रकल्पाचे फायदे तोटे न समजावता प्रल्कप लादण्याचे काम चालू आहे. स्थानिकांची घरे, चाळी, इमारती, फार्म हाऊस आणि इतर बांधकामे बेकायदेशीर ठरवून त्यांना नोटीस आणि तोडण्याचे काम होत आहे. नैना प्रशासन मोफत ६० टक्के जमीन घेऊन शेतकर्‍यांवर अन्याय करत असून, ही दडपशाही सहन केली जाणार नाही. शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष चालू राहील, अशा पद्धतीचा संदेश यावेळी देण्यात आला.
  • आपली भाकरी वाचवण्यासाठी उपोषण                                                                                   तुम्ही-आम्ही एकत्र आलो तर विजयापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले. शासनाने यूडीसीपीआर लागू करावा आणि नैनाऐवजी एमएमआरडीए, महापालिका क्षेत्र घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली. आपली भाकरी वाचवण्याच्या दृष्टीने या आमरण उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -