घररायगडखालापूरात शरद पवार गटाला दुसरा धक्का; युवानेते अमर मानकावळे भाजपात

खालापूरात शरद पवार गटाला दुसरा धक्का; युवानेते अमर मानकावळे भाजपात

Subscribe

खोपोली- : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर बहुसंख्य कार्यकर्ते, समर्थकांनी लाड यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. लाड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे युवानेते अमर मानकावळे यांच्यासह शिरवली ग्रुप ग्रामपंचायतीचे तीन सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी कर्जत येथे संपर्क प्रमुख प्रकाश बिनेदार यांच्या उपस्थितीत जाहिर प्रवेश केला आहे. (Another blow to Sharad Pawar group in Khalapur, NCP joins BJP)  कर्जत दहिवली येथील माजी आमदार सुरेश लाड यांच्या मध्यवर्ती कार्यालयात लाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस, कर्जत संपर्क प्रमुख प्रकाश बिनेदार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील, कर्जत-खालापूर विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, वसंत भोईर, विधानसभा युवक प्रमुख प्रसाद पाटील, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर,खालापूर तालुका सरचिटणीस रविंद्र पाटील, राजेश भगत,राकेश जाधव, सुनील सुखदरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) युवानेते अमर मानकावळे यांनी थेट सरपंचपदासाठी शिरवली ग्रामपंचायतीच्या निवडणूक लढवली. काही मतांनी मानकावळे यांच्या पराभव झाला. तर तीन महिला सदस्या निवडणून आल्या आहे. माजी आमदार सुरेश लाड यांच्या बरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती,राष्ट्रवादीचे खालापूर तालुकाध्यक्ष नरेश पाटील यांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर या दोन्हीही दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे.

भाजपात या पदाधिकार्‍यांचा प्रवेश
अमर मानकावळे यांच्यासह शिरवली ग्रुपग्रामपंचायतीच्या दिपाली जाधव, रंजना मरगळे, करूणा जाधव तसेच बाळू मानकावळे, अशिष मानवकावळे, दत्ता झोरे, परेश जाधव, हरेश जाधव, बाबू मरगळे, सुरज जाधव, राजेश जाधव, संतोष हिरवे, रामदास पाटील, अनिल पाटील, संदीप पाटील, दिनेश पाटील, ओमनगर बांदल, अजय मोरे, अमित मोरे, अनमोल पाटील, प्रणय (मुन्ना) मोरे, आदर्श मानकवळे, भिवसेन बांदल, मोहिनी झोरे, विद्या जाधव

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत राष्ट्रवादीत असताना एकजुटीने काम केले आहे. भाजपाकडून माझ्या समवेत पक्षप्रवेश करणार्‍या सर्वांचा मानसन्मान केला जाईल. अमर मानकावळे आणि सर्व प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो.
– सुरेश लाड, माजी आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -