घररायगडमहाडमध्ये मार्गदर्शक फलकांची गरज; दापोली,खेड, चिपळूणकडील प्रवाशांचा उडतोय गोंधळ

महाडमध्ये मार्गदर्शक फलकांची गरज; दापोली,खेड, चिपळूणकडील प्रवाशांचा उडतोय गोंधळ

Subscribe

गेले वर्षभरापासून आंबेत पूल डागडुजी साठी बंद आहे. यामुळे वाहतूक महाड मार्गे फिरवली असल्याने दापोली, मंडणगड आणि खेड, रत्नागिरी मार्गाकडे जाणारी छोटी वाहने महाड शहरातून मार्गस्थ होत आहेत. मात्र शहरात दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. गुगल नकाशाचा वापर करत असल्याने अनेक वाहने बाजार पेठेत शिरतात. योग्य मार्ग मिळत नसल्याने शहरात ठिकठिकाणी शहरात मार्गदर्शकांची फलकांची गरज आहे.

महाड: गेले वर्षभरापासून आंबेत पूल डागडुजी साठी बंद आहे. यामुळे वाहतूक महाड मार्गे फिरवली असल्याने दापोली, मंडणगड आणि खेड, रत्नागिरी मार्गाकडे जाणारी छोटी वाहने महाड शहरातून मार्गस्थ होत आहेत. मात्र शहरात दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. गुगल नकाशाचा वापर करत असल्याने अनेक वाहने बाजार पेठेत शिरतात. योग्य मार्ग मिळत नसल्याने शहरात ठिकठिकाणी शहरात मार्गदर्शकांची फलकांची गरज आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणार्‍या आंबेत पूलाची गेली वर्षभरापासून दुरुस्ती सुरु आहे. पुलाचा एक पिलर खचल्याने तो डागडुजी साठी बंद आहे. अद्याप दुरुस्ती सुरु असल्याने पुलावरून वाहतूक कधी सुरू होईल याची खात्री नाही. मंडणगड, दापोली, बाणकोट, महाप्रळ आणि रत्नागिरी जिल्ह्यात मार्गाने शेकडो वाहने ये -जा करत असतात. सध्या हा मार्ग बंद असल्याने पर्यायी मार्ग म्हणून महाड शहरातून रत्नागिरी कडे जाण्यासाठी विन्हेरे मार्गे आणि दापोली, मंडणगड, बाणकोट कडे जाण्यासाठी विन्हेरे रेवतळे लाटवण मार्गाचा अवलंब करतात. मात्र या मार्गाने जाण्यासाठी प्रत्येक वाहनांना महाड शहरातूनच जावे लागते. महाड शहराच्या सुरवातीलाच गांधारी पुल संपल्यानंतर तीन मार्ग आहेत. बहुतेक वाहने गुगल नकाशाचा वापर करून प्रवास करतात त्यामुळे अनेक वाहने बाजार पेठेच्या रस्त्याने सरळ जातात. वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

नियोजनाअभावी वाहतूक कोंडी
गांधारी नाका येथून प्रवेश करणारी वाहने थेट मोहल्ल्यातून बाजारपेठेत जातात. यामुळे बाजारपेठेतील गर्दी आणि वाहनांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडी होते.अनेक वाहने छत्रपती शिवाजी चौक येथे आल्यानंतर कोणत्या मार्गाने दापोलीकडे जायचे याबाबत गोंधळ उडताना दिसतो. छत्रपती शिवाजी चौक ते वीरेश्वर मंदिर या ठिकानाहून दादली पुलावरून दापोलीकडे जाण्यास मार्ग आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विरेश्वर मंदिर या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा उभी असणारी वाहने, रस्त्यावर बसणारे विक्रेते, भाजीविक्रेत्यांची रत्यावर थाटलेली दुकाने यामुळे वाहनांना मार्ग काढताना मोठा त्रास होतो. महाड नगर पालिका आणि पोलीस प्रशासन याबाबत योग्य नियोजन करत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढतच चालली आहे.

- Advertisement -

गुगलमुळे प्रवासी शिरतात गल्लीबोळात
वाहन चालकाना होणार्‍या अशा अडचणी दूर करण्यासाठी महाड नगर पालिकेच्यावतीने दिशादर्शक फलकाची आवश्यकता आहे. शहराच्या सुरवातीला गांधारी नाका, दस्तुरी नाका, शिवाजी चौक, विरेश्वर मंदिर आणि दादली पुल या पाच ठिकाणी स्पष्ट दिसतील असे मार्गफलक लावणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक कोंडी दूर करणे आणि दापोली खेड, चिपळूणकडे जाणार्‍या आणि त्या भागातून मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना प्रवास करताना योग्य नियोजन करण्यासाठी पोलिसांनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहरात चुकीच्या मार्गावरून ये जा करणार्‍या प्रवाशांना गुगलमुळे गल्लीबोळात शिरावे लागत आहे. अनेकवेळा मोठ्या बसेस अशा अरुंद जागी अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -