Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर रायगड पहिल्याच पावसात नेरळचे पोस्ट कार्यालय पाण्यात

पहिल्याच पावसात नेरळचे पोस्ट कार्यालय पाण्यात

Related Story

- Advertisement -

दोन दिवस पडलेल्या पावसाने येथील पोस्ट कार्यालय पाण्यात जाऊन तळ्याचे स्वरुप आले असून, त्यामुळे कामानिमित्त येणार्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

खांडा भागात पोस्ट कार्यालयाची इमारत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे कोणत्याही प्रकारे उपाययोजना करण्यात आली नसल्याने दरवर्षी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावसदृश्य परिस्थिती निर्माण होते. सोमवार आणि मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.

- Advertisement -

कार्यालयात दररोज अनेक नागरिक कामानिमित्त येत असतात. परंतु अनेक नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. कधी इंटरनेट नाही, कधी कर्मचार्यांची कमतरता, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच इमारतीच्या आवारात पावसाचे पाणी जमा होणे नित्याचे झाल्याने गुडघाभर पाण्यातुन ये-जा करावी लागते. यावर मात्र कोणतीही उपाययोजना अधिकारी करीत नाहीत. अधिकार्यांची ही बघ्याची भूमिका नाराजीचे कारण ठरत आहे.

- Advertisement -