घररायगडमहाड एमआयडीसीला नवी सांडपाणी वाहिनी

महाड एमआयडीसीला नवी सांडपाणी वाहिनी

Subscribe

नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. पाईपलाईनचे काम पूर्णत्वास आल्यानंतर गळती आणि पाईपलाईन फुटण्याच्या घटनांवर नियंत्रण येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. येथील एमआयडीसीमधील रासायनिक उद्योग क्षेत्रातील सांडपाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर ओवळे येथे खाडीमध्ये सोडले जाते.

 

महाड: येथील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईप लाईन जीर्ण झाल्याने सतत फुटण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे याठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. पाईपलाईनचे काम पूर्णत्वास आल्यानंतर गळती आणि पाईपलाईन फुटण्याच्या घटनांवर नियंत्रण येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
येथील एमआयडीसीमधील रासायनिक उद्योग क्षेत्रातील सांडपाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर ओवळे येथे खाडीमध्ये सोडले जाते. औद्योगिक क्षेत्र निर्मिती झाल्यानंतर रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच खाडीत सोडले जात होते यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी झाली. यावर उपाय म्हणून सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले. येथून हे पाणी थेट आंबेत खाडीत सोडण्याचे धोरण होते मात्र राजकीय विरोधामुळे हे पाणी महाड तालुक्यातच ओवळे गावात सोडले जात आहे. याकरिता जी पाईपलाईन टाकण्यात आली ती सिमेंट काँक्रीट प्रकारातील होती. यामुळे गेली अनेक वर्षापासून जाणार्‍या रासायनिक सांडपाण्यामुळे ही पाईपलाईन गाळाने भरून बंद पडण्याच्या मार्गावर होती. शिवाय साचलेल्या गाळामुळे पाणी सुलभरित्या जात नसल्याने वारंवार फुटून शेतकर्‍यांचे नुकसान होत होते. यामुळे वारंवार आंदोलने आणि शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या नुकसान भरपाईवर तोडगा काढण्यासाठी जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
जुन्या पाईपलाईन प्रमाणेच नवीन पाईपलाईन ही किमान २४ ते २५ किमी लांबीची आहे. याकरिता हाय डेन्सिटी पॉलीथिन या प्रकारातील पाईप वापरले जाणार आहेत. या पाईपचा व्यास हा ७१० एम एम आहे. या प्रकारातील पाईप मुन्सीपल आणि इंडस्ट्रीयल क्षेत्रात वापरला जातो.

- Advertisement -

कामासाठी ७९ कोटी रुपये मंजूर
अधिक काळ टिकाऊ आणि रासायनिक घटकाचा परिणाम फार कमी प्रमाणात होतो त्यामुळे पाईपलाईन दीर्घकाळ टिकून गळती थांबणार असल्याचे महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे अभियंता बोबडे पाटील यांनी सांगितले. या कामाला मंजुरी मिळाली असून कार्यादेश देखील देण्यात आला आहे. या कामासाठी जवळपास ७९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षाचा आहे मात्र महाप्रळ पंढरपूर मार्गाचे रुंदीकरण असल्याने राजेवाडी ते म्हाप्रळ पर्यंत रस्त्याला लागुनच पाईपलाईन जाणार असल्याने संबंधित विभागाने अद्याप मोजणी करून न दिल्याने याठिकाणी सदर कामास विलंब लागण्याची शक्यता आहे.

पाईपलाईन फुटण्याचे प्रकार थांबणार
महाड एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांचे पाणी सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून पुढे ओवळे येथे खाडीत सोडले जाते. औद्योगिक क्षेत्र उभारणी केल्यानंतर येथील पाणी विना प्रक्रिया खाडीत सोडले जात होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली होती. यामुळे सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उपयोगात आणले गेले. पूर्वी असलेली पाईपलाईन काँक्रीट स्वरूपातील असल्याने जीर्ण झाली होती. या नव्या कामामुळे सातत्याने होणारी गळती आणि पाईपलाईन फुटण्याचे प्रकार थांबणार आहेत.

- Advertisement -

नव्या पाईपलाईनच्या कामाला मंजुरी मिळाली असून आधुनिक प्रकारातील या पाईपमुळे गळती थांबून वारंवार उद्भवणार्‍या समस्येतून सुटका होण्यास मदत होणार आहे. महामार्ग विभाग आणि अन्य विभागाने पाईपलाईन टाकण्यास मार्किंग करून दिल्यास अडथला येणार नाही.
– संतोष कारंडे,
कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, महाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -