घररायगडउल्हास पेजनदी पाणीचोरावर ’चिकट्टपट्टी’ मारून कारवाई; मोटार, पाईपलाईन जप्त करण्याची तसदी नाहीच

उल्हास पेजनदी पाणीचोरावर ’चिकट्टपट्टी’ मारून कारवाई; मोटार, पाईपलाईन जप्त करण्याची तसदी नाहीच

Subscribe

कर्जत तालुक्यातील उल्हास पेजनदीतून विना परवानगी मोटार टाकून फॉर्म हाऊस मालक पाणीचोरी करीत असल्याची बातमी दैनिक आपलं महानगर ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भरत गुंटुरकर यांनी शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी पाणीचोर फॉर्म हाऊस मालकांवर कारवाई करण्याचे आदेश सिंचन शाखा साळोख येथील दफ्तर कारकून यांना दिले होते. पण प्रत्यक्षात सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी पत्र देवूनही कारवाई करण्यात आली नाही.

उल्हास पेजनदीतून दिवसाढवळ्या ’पाणीचोरी’ होत असल्याची माहिती पत्रकारांनी पाटबंधारे विभागाला दिल्यानंतरही चालढकल करण्यात येत होती. दरम्यान, वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांकडून कारवाईचा देखावा करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्जत तालुक्यातील उल्हास पेजनदीतून विना परवानगी मोटार टाकून फॉर्म हाऊस मालक पाणीचोरी करीत असल्याची बातमी दैनिक आपलं महानगर ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भरत गुंटुरकर यांनी शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी पाणीचोर फॉर्म हाऊस मालकांवर कारवाई करण्याचे आदेश सिंचन शाखा साळोख येथील दफ्तर कारकून यांना दिले होते. पण प्रत्यक्षात सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी पत्र देवूनही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांकडून बुधवारी १६ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, ही कारवाई म्हणजे जलसंधारण विभाग, पाटबंधारे विभाग व पत्रकारांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे दिसून येत आहे. पत्रकारांनी गुरूवारी १७ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता उल्हास पेजनदीच्या शेजारी असलेल्या वेअरहाऊसच्या कुलूपाला चिकटपट्टी सह्या मारून लावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आतील बोर्डाला पेपर लावून चिकटपट्टी मारण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुळात तेथील मोटार ऑटोमोडवर असल्याने मोटार सुरू करण्यासाठी वेअरहाउसला जाण्याची गरज नाही. एवढेच नव्हे तर त्यासाठी बटन सुरु-बंद करण्याची गरज नाही.

पाटबंधारे विभागाला पाणीचोर फॉर्म हाऊस मालकांवर कारवाई करायची होती, तर पाण्याची मोटार जप्त का करण्यात आली नाही? त्याचप्रमाणे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भरत गुंटुरकर यांनीच आपल्या पत्रात कारवाईचे आदेश दिल्याने उल्हास पेजनदीत असलेले पाईप का जप्त करण्यात आले नाहीत? त्याच प्रमाणे उल्हास पेजनदीतून पाणीचोरी होणारी फॉर्म हाऊसपर्यतची पाईपलाईन खोदून जप्त का करण्यात आली नाही? फक्त चिकटपट्टी लावून पाटबंधारे विभागाने फॉर्म हाऊस मालकाला का सांभाळून घेण्यात आले ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय
कर्जत तालुक्यातील गणेगांव चिंचवली गावाच्या हद्दीतील सर्व्हे नंबर ३७ ही वनविभागाची जागा असताना फार्म हाऊस मालक ललीतकुमार एस. कनोडीया व इतर फार्म हाऊस मालक उल्हास पेजनदीमधून अवैधरित्या पाणी उपसा करीत आहेत. फार्म हाऊस मालकाने उपसा सिंचनास परवानगी मिळण्यासाठी उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग कर्जत यांच्याकडे ९ एप्रिल २०२१ रोजी लेखी पत्राद्वारे परवानगी मागितली होती. याबाबत उपविभागीय अभियंता पाटबंधारे कर्जत यांनी सदर पत्राला २७ एप्रिल २०२१ ला लेखी स्वरुपात उत्तर देताना सांगितले की, आपण उल्हास – पेजनदीमधून आपली पाईपलाईन नदीपासून फॉर्म हाऊसपर्यंत कशी टाकणार, त्याबाबत नकाशावर रंगवून या कार्यालयास सादर करावे. तसेच ज्या जागेमधून पाईपलाईन जाणार आहे, त्या भूधारकांचा नाहरकत दाखला सोबत जोडण्यात यावा. जेणेकरून आपणास सिंचनाची परवानगी देणे शक्य होईल. परंतु फॉर्म हाऊस मालकाने याबाबत कागदपत्रे सादर न करता अवैधरित्या पाणी उपसा सुरूच ठेवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -