घररायगडखोपोली नगरपालिकेला वनखात्याची ‘एनओसी‘ मिळेना;आपचे उपोषण

खोपोली नगरपालिकेला वनखात्याची ‘एनओसी‘ मिळेना;आपचे उपोषण

Subscribe

खोपोली-; ताकई ते साजगाव रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. यातील काही मीटरचा रस्ता हा वनविभागाच्या हद्दीत येत आहे. (Takai to Sajgaon road work not getting ‘NOC’ of forest department) या परवानगीच्या कारणास्तव सदरचे काम थांबविण्यात आले आहे. वनखात्याची परवानगी मिळविण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून खोपोली नगरपालिकेचा बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र नगरपालिकेला परवानगी मिळविण्यात अपयश आल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांचे हात होत असून रस्त्याच्या कामासाठी आता उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे आणि कार्यकर्ते साखळी उपोषणाला बसले आहेत.

खोपोली नगरपालिकेकडून सुरु करण्यात आलेल्या कामाला वनविभागाने परवानगी अभावी ब्रेक लावल्याने ताकईच्या रस्त्यावरून वाहने चालविताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बरोबरच मानसिक व शारिरीक व्याधीं वाढल्या आहेत.

- Advertisement -

सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि या रखडलेल्या रस्त्याच्यामुळे नागरिकांना सोसावा लागणारा नाहक त्रास याकडे लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषद कार्यालया समोर सोमवार २६ फेब्रुवारीपासून आपचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.या कामात दिरंगाई करणार्‍या नगरपालिकेतील कर्मचार्‍यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी देखील डॉ.जांभळे यांनी केली आहे. त्याच्या उपोषणाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -