Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर रायगड ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या पिल्लांना जीवदान

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या पिल्लांना जीवदान

Subscribe

मुरुड: येथील समुद्रकिनार्‍यावर ऑलिव्ह रिडले कासव जातीच्या पिल्लांना सर्पमित्र संदिप घरत यांनी काल रात्री समुदी अधिवासात सोडुन जीवदान देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी मुरुड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी दिसून आली.तिच्यामागे कुत्रे लागल्याने रहिवासी दांडेकर यांनी कुत्र्यांना हाकलले आणि सर्पमित्र संदिप घरत यांना बोलवण्यात आले.त्यावेळी ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी दिसून आली.

मुरुड: येथील समुद्रकिनार्‍यावर ऑलिव्ह रिडले कासव जातीच्या पिल्लांना सर्पमित्र संदिप घरत यांनी काल रात्री समुदी अधिवासात सोडुन जीवदान देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी मुरुड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी दिसून आली.तिच्यामागे कुत्रे लागल्याने रहिवासी दांडेकर यांनी कुत्र्यांना हाकलले आणि सर्पमित्र संदिप घरत यांना बोलवण्यात आले.त्यावेळी ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी दिसून आली. ती अंडी टाकण्याकरिता आली असावी. ती मादी कशी सुरक्षित राहील त्याकरिता समुद्र किनार्‍यावरच नियोजन करून त्याठिकाणी दोन फूट खड्डा खोदून साईटनी कुपन घालण्यात आली.त्याठिकाणी मादीला सोडण्यात आले.दुसर्‍या दिवशी मादीनी खड्ड्यात अंडी घालून समुद्रात निघून गेली.
याबाबतची माहिती वनविभागाचे अधिकारी मनोज वाघमारे त्याबरोबर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे, तहसीलदार रोहन शिंदे यांना कळविले होते. दोन महिन्यांनंतर काल रात्रीच्या दरम्यान अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर खड्ड्यातून पिल्लं बाहेर येऊ लागली. पिल्लांना कुत्र्यापासून संरक्षण मिळण्यासाठी रात्रीच्या वेळीच सर्पमित्र घरत यांनी पिल्लांना समुदी अधिवासात सोडून जीवदान देण्यात आले.

कासव हा निसर्ग संवर्धनातील महत्वाचा घटक मानला जातो.कासवाला जीवदान देणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे, तसेच समुद्रकिनार्‍यावर सापडलेली ऑलिव्ह रिडले कासव जातीची अंडी दोन महिने सुरक्षित राहण्यासाठी गोल्डन स्वॉन ब्रिच हॉटेलनी लाईट पुरवली आणि प्रत्येकांच्या सहकार्यामुळे ही अंडी सुरक्षित राहिली आणि आज अंड्यातून पिल्लं जन्माला आली. पिल्लांच्या सुरक्षेसाठी त्यांना आज समुदात सोडण्यात आले आहे.
– संदिप घरत
सर्पमित्र, मुरुड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -