घररायगडश्री आप्पासाहेब धर्माधिकारी - अध्यात्मविद्या आणि प्रबोधन

श्री आप्पासाहेब धर्माधिकारी – अध्यात्मविद्या आणि प्रबोधन

Subscribe

"श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग" येथून श्री आप्पासाहेब जगभर पसरलेला हा सगळा कार्यभाग सांभाळत असतात. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी श्री आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. त्यांचे अमूल्य विचार ऐकून आत्मसात करणाऱ्या श्री सदस्यांवर आलेल्या प्रसंगांमध्ये त्यांना स्थिती देऊन उभे करणे, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे श्री आप्पासाहेब ह्याचे मूळ कार्य.

भाषण आणि निरूपण ह्या दोन शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. भाषण ऐकून बदल घडेल हे सांगू शकत नाही परंतु निरूपण श्रवण केल्याने माणसाच्या अंतरंगात अमुलाग्र बदल होतो हे निश्चित आहे. त्यातून जर श्री आप्पासाहेब ह्यांच्या मौखिक निरुपणाचा प्रसाद मिळाला तर दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यात श्री आप्पासाहेब ह्यांचे मार्गदर्शन लाभले त्यांना जगण्याची योग्य दिशा मिळाली आहे हे सत्य नाकारता येऊ शकत नाही. आजपर्यंत श्री आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना आपण स्वच्छतादूत म्हणून ओळखत होतो. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या आणखी काही व्यक्तिमत्त्व पैलूची ओळख घेतली पाहिजे.

“श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग” येथून श्री आप्पासाहेब जगभर पसरलेला हा सगळा कार्यभाग सांभाळत असतात. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी श्री आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. त्यांचे अमूल्य विचार ऐकून आत्मसात करणाऱ्या श्री सदस्यांवर आलेल्या प्रसंगांमध्ये त्यांना स्थिती देऊन उभे करणे, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे श्री आप्पासाहेब ह्याचे मूळ कार्य. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी १९४३ सालापासून केली. ग्रंथराज श्रीमत दासबोध घराघरात जर कोणी पोहोचवला असेल तर ते आपले नानासाहेब !!!. श्रीमत दासबोध ह्या ग्रंथाचा आधार घेऊन आपल्या प्रासादिक वाणीने, मौखिक निरुपणाच्या साहाय्याने श्री नानासाहेबांनी प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवले. आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य श्री आप्पासाहेब करत आहेत.

- Advertisement -

आज फक्त महाराष्ट्र नव्हे, आजूबाजूची राज्य नव्हे, फक्त भारत देश नव्हे तर अनेक देशांमध्ये ह्या मौखिक निरुपणाच्या साहाय्याने, वेगवेगळ्या भाषांमध्ये श्री समर्थ बैठका चालू आहेत. ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी त्यांचे लाखोंच्या संख्येने असलेले सदस्य हे निरूपण ऐकण्यासाठी आवर्जून जात असतात. २५ नोव्हेंबर २००८ ह्या दिवशी खारघर नवी मुंबई येथे महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी तब्बल ३५ लाख श्री सदस्य जमले होते अशी लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लाजवेल असे हे कार्य श्री आप्पासाहेब रेवदंडा येथे बसून कसे काय करतात हे प्रत्येकासाठी आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहे. दिवसेंदिवस ही सदस्य संख्या वाढत जात असताना दिसत आहे. आता महाराष्ट्रात जर सत्कार समारंभ घ्यायचा असेल आणि तिथे सर्व श्री सदस्यांना एकत्र करायचं असेल तर अशी एखादी जागा कुठे शिल्लक असेल का? असा विचार येतो. लहान मुले, स्त्रिया, पुरुष, वयोवृद्ध अशा सर्व वयोगटातील सदस्यांना ह्या श्री बैठकीमधून मार्गदर्शन मिळत असते.

अनेक प्रकारच्या व्यसनामध्ये अडकलेले लोक श्रीबैठकीतील उत्तम विचारांमुळे हळू हळू ह्या व्यसनांपासून दूर जातात, अशी कित्येक उदाहरणे ह्या श्री बैठकीत पाहायला मिळतात. अशी कोणती ताकद ह्या मौखिक निरुपणामध्ये असावी ह्याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. ठरलेल्या दिवशी एक एक करून काही मिनिटांमध्ये १०००-२००० सदस्य एकत्र येऊन हॉल भरून जातात. निरूपण चालू असताना तिथे एवढी शांतता असते की, आतमध्ये कितीजण बसले आहेत ह्याचा अंदाज बाहेरून लावायचा असेल तर रांगेत लावलेल्या चपलांवरून लागू शकतो. एवढी शिस्त, एवढी शांत बसण्याची ताकत ह्या सदस्यांमध्ये कुठून येत असेल असा प्रश्न नेहमी पडतो. म्हणजेच श्री आप्पासाहेब आपल्या अध्यात्मासोबत आचरणाबद्दल सुद्धा मौखिक निरूपण देत असतात. खरोखर जो ही शिकवण अंतःकरणात घेतो त्याचे पुढील दिवस सुगीचे असतात ह्यात शंका नाही.

- Advertisement -

सतत मोबाईलमध्ये व्यस्त असलेली आताची तरुण पिढी आणि अध्यात्म निरूपण ह्याचा दूर दूर पर्यंत संबंध नसतो. पण श्रीआप्पासाहेबांच्या बैठकीमध्ये हे चित्र एकदम उलट दिसून येते. जास्तीत जास्त तरुण मुले ह्यामध्ये समाविष्ट झालेली दिसून येतात, ह्या निरुपणाची अवीट गोडी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसत आहे. परमार्थ हा विषय तसा खूप गहन आहे. तो समजावून घेण्यासाठी श्री आप्पासाहेबांची साथ कायम असणे गरजेचे आहे. अध्यात्माची, ईश्वराची योग्य ती ओळख होण्यासाठी साथ लागते ती योग्य व्यक्तिमत्त्वाची… आणि लाखो श्री सदस्यांच्या आयुष्यातील ते श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत.

श्रीमत दासबोध हा असा ग्रंथ आहे की, त्यामध्ये एकही चित्र नाही, वरवर वाचण्याचा प्रयत्न केला तर त्याचा खरा अर्थ कळत नाही. त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यावर अध्यात्मिक निरूपण मिळणे हे गरजेचे आहे. श्री आप्पासाहेब ह्यांचे अध्यात्मिक ज्ञान हे वाखाणण्याजोगे आहे. श्रीमत दासबोध ह्यामध्ये समर्थ रामदास स्वामी ह्यांनी वापरलेली भाषा ही सहज कळेल अशी असली तरी त्यामध्ये अध्यात्मिक अर्थ ओतप्रोत भरलेला आहे. नेमका तोच अर्थ आप्पासाहेब आपल्या निरुपणातून काढून देत असतात. संसारात गुरफटलेल्या माणसांना पिंड ब्रह्मांडाची निर्मिती, मूळमाया, त्रिगुण, षडगुणेश्वर, अष्टधा प्रकृती, शिवशक्ती, पंचमहाभूते अश्या शब्दांचा अर्थ कळणे खूप कठीण आहे. हे शब्द कोणत्याही अभ्यासक्रमात सहजासहजी येत नाहीत. परंतु ह्या दुर्मिळ आणि अतिमहत्त्वाच्या शब्दांची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे हे जाणून श्री आप्पासाहेब ह्यांनी मूळ ईश्वराची ओळख आपल्या निरुपणातून देण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे.

अनेक श्री सदस्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या पद्मश्री डॉ. श्री. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी प्रणाम व शिर साष्टांग दंडवत.. आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!!

                                                                                       – अतिष म्हात्रे,  आगरसुरे- अलिबाग

                                                                                

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -