घररायगडजिल्हा परिषदेत दोन डोस घेतलेल्यांनाच मिळणार प्रवेश

जिल्हा परिषदेत दोन डोस घेतलेल्यांनाच मिळणार प्रवेश

Subscribe

या सर्वसाधारण सभेत कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांवर तसेच जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवरील सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद इमारतीत केवळ दोन डोस घेतलेल्या अभ्यागतांना प्रवेश देण्यात यावा असा ठराव घेण्यात आला.

जिल्हा परिषदेत कामानिमित्त नियमितपणे मोठ्या संख्येने जिल्हाभरातून अभ्यागत येत असतात. सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढला असून, संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत केवळ दोन डोस घेतलेल्या अभ्यागतांना प्रवेश देण्यात यावा, तसेच अभ्यागतांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यासाठी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी घेण्यात आला.

रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, कृषी व पशसंवर्धन सभापती बबन मनवे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्यासह सर्व पक्षांचे पक्षप्रतोद, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

या सर्वसाधारण सभेत कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांवर तसेच जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवरील सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद इमारतीत केवळ दोन डोस घेतलेल्या अभ्यागतांना प्रवेश देण्यात यावा असा ठराव घेण्यात आला.
सभेत आरोग्य विभागासह १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याप्रश्नी चर्चा करण्यात आली. तसेच पाणी पुरवठा योजना, पाणी स्त्रोतांचे मजबूतीकरण, गाळ उपसा कामांचा आढावा घेण्यात आला. यासह शिक्षण, ग्रामपंचायत, बांधकाम विभागातील विभागातील प्रश्नांबाबत तसेच योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे सोमवारी वृद्धापकळाने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत धडकताच प्रा. एन. डी .पाटील यांना सर्व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्धपणे उभे राहून श्रद्धांजली वाहिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -