घररायगडपोलादपूर तालुक्यावर दरडींची दहशत; पुनर्वसनास होणार्‍या विलंबामुळे दरड बाधीतांची फरफट

पोलादपूर तालुक्यावर दरडींची दहशत; पुनर्वसनास होणार्‍या विलंबामुळे दरड बाधीतांची फरफट

Subscribe

डोंगराळ पोलादपूर तालुक्यावर २५ जुलै २००५ म्हणजे गेल्या सतरा वर्षापासून नैसर्गिक आपत्तीचे संकट घोंगावत असून या निसर्ग प्रकोपाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या गावांचे पुर्नवसन झालेले नाही हे वास्तव चित्र पुढे आले आहे. डोंगरदर्‍याखोर्‍यात कडे -कपारीत पिढ्यान् पिढ्यांपासून वसलेल्या गाव वाड्यांमधील जनतेच्या ऊरात पाऊस सुरु झाल्यावर धडकी भरत असते आणि पावसाचा जोर वाढला तर अक्षरशः रात्री जागून काढाव्या लागतात, असे ग्रामीण जनतेकडून सांगण्यात येते.

पोलादपूर: डोंगराळ पोलादपूर तालुक्यावर २५ जुलै २००५ म्हणजे गेल्या सतरा वर्षापासून नैसर्गिक आपत्तीचे संकट घोंगावत असून या निसर्ग प्रकोपाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या गावांचे पुर्नवसन झालेले नाही हे वास्तव चित्र पुढे आले आहे. डोंगरदर्‍याखोर्‍यात कडे -कपारीत पिढ्यान् पिढ्यांपासून वसलेल्या गाव वाड्यांमधील जनतेच्या ऊरात पाऊस सुरु झाल्यावर धडकी भरत असते आणि पावसाचा जोर वाढला तर अक्षरशः रात्री जागून काढाव्या लागतात, असे ग्रामीण जनतेकडून सांगण्यात येते.
मागील २५ आणि २६ जुुलै २००५ रात्री झालेल्या अतिवृष्टीच्या प्रलयात सावित्री नदीला आलेल्या महापूरात पोलादपूर सवाद लोहारे या गावांतील जनतेची अपरिमित हानी झाली होती तसेच लोहारे व कोतवाल या गावातील घरे जमिनीखाली गाडली गेली होती. या संकटात अकरा जणांना जीव गमवावे लागले होते तरअनेक घरांचे नुकसान झाले होते. या आपद्ग्रस्तांना शासकीय मदत मिळाळीअस ली तरी कोतवाल आणि कोंढवी या बाधीत गावांतील अतिवृष्टीग्रत कुटुंबांसाठी बांधण्यात आले. घरे आजमितीस बाधीत कुटुंंबांवाचून रिकामी असल्याचे दिसून येत असल्याने या मागील कारण कोणते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केवनाळे आणि सुतारवाडी येथील बाधीतांसाठी जमीन संपादीत करण्यात आली असून सुतारवाडीतील ४४ कुटुंबांना आणि केवनाळे गावातील १२८ कुटुंबांचे पुर्नवसन होणार आहे. यापैकी ४४ घरे टाटा समूह आणि १२८ घरे महेंद्र कोटक समूहाकडून बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर येथील बाधीतांना घरे मिळणार असल्याने सध्या तरी येथील दरडग्रस्तांच्या पुर्नवसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र असे असले तरी प्रशासनाकडून पुर्नवसनासाठी विलंब लागू नये. बाधीतांसाठी योग्य तर्‍हेने वेळीच उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

लोखंडी बॉक्स टाईप घरांमध्ये राहण्याची सोय
गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पावसाळ्यात कोठे ना कोठे गाव परिसरात दरडी कोसळल्या असून १३ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीत केवनाळे आणि सुतारवाडी या गावांमध्ये दरडी कोसळल्या. या वेळी अनेकांचे संसार उघड्यावर आले. या प्रकोपात ११ जण मृत्यु पावले. अशा कुटुंबांतील ७ कुटुंबांना लोखंडी बॉक्स टाईप घरांमध्ये राहण्याची सोय शासनाकडून करण्यात आली तर काही कुटुंबानी नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. यावेळी आपद्ग्रस्तांना शासनासह सर्व बाजूंनी मदतीचा ओघ होता. उपलब्ध माहितीनुसार आजही देण्यात आलेल्या बॉक्सटाईप घरांपैकी एका घरात एक वृद्ध कुटुंब आणि एका घरात वृध्द महिला राहातेय. पोलादपुरातील वाढत्या उकाड्यात या दिवसामध्येही कुटुंबे कसे राहात असतील याची साधी कल्पनाही करवत नाही. विशेष म्हणजे तालुक्यातील गावे,वाड्या डोंगरमाथा ते पायथ्याशी वसलेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -