घररायगडमाजी महापौर जगदीश गायकवाड पोलिसांच्या ताब्यात

माजी महापौर जगदीश गायकवाड पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

पनवेल सत्र न्यायाल्याकडून गायकवाड यांना जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्या नंतर न्यायालया बाहेर आलेल्या गायकवाड यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल असल्यामुळे कर्जत पोलिसांनी गायकवाड यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता गायकवाड समर्थक आणि पोलिसांमध्ये बचाबाची झाल्याचा प्रकार घडला. बचाबाची नंतर ताब्यात घेण्यात आलेल्या गायकवाड यांना घेऊन पुढील सुनावणी साठी कर्जत पोलीस रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पनवेल: दीपक घरत
वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्या बाबत पनवेल पालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गायकवाड यांना पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या दरम्यान पनवेल सत्र न्यायाल्याकडून गायकवाड यांना जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्या नंतर न्यायालया बाहेर आलेल्या गायकवाड यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल असल्यामुळे कर्जत पोलिसांनी गायकवाड यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता गायकवाड समर्थक आणि पोलिसांमध्ये बचाबाची झाल्याचा प्रकार घडला. बचाबाची नंतर ताब्यात घेण्यात आलेल्या गायकवाड यांना घेऊन पुढील सुनावणी साठी कर्जत पोलीस रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ गायकवाड यांच्याबद्दल सध्या वंचित बहुजन आघाडी तसेच बौद्ध संघटनेकडून मंगळवारी तीव्र निषेध करण्यात आला. गायकवाड यांनी आंबेडकर यांच्या बाबत विधान केल्याबाबत आरोप करण्यात आला.याबाबत सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप तसेच फेसबुकचा वादग्रस्त मजकूर व्हायरल झाला आहे. तर जगदीश गायकवाड यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले असून,व्हायरल झालेली क्लिप खोटी असल्याने या क्लिप ची चोकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्यावतीने तहसीलदार विजय तळेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

रीतसर तक्रार निवेदन
गायकवाड यांच्याकडून सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा रोष मनात ठेऊन बौद्ध आणि भीमसैनिक एकवटले असून याबाबत तात्काळ माफी मागून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली होती. तसेच याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि कळंबोली पोलीस ठाणे यांच्याकडे जगदीश गायकवाड यांच्या या वक्तव्याबाबत रीतसर तक्रार निवेदन देण्यात आलेलं आहे. यावेळी शेकडो भिमसैनिक एकवटले होते . तर बुधवारी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -