पनवेल : हार्बर मार्गावरील शेवटचे स्टेशन पनवेल आणि मध्य रेल्वेवरील शेवटचे स्टेशन कर्जत आहे. हे दोन्ही स्टेशन नव्या कॉरिडॉरने जोडले जाऊन यंदाच पनवेल कर्जत मार्ग वाहतुकीला खुला होणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प अंतर्गत पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे काम सुरू आहे. या कामाला आता वेग आला असून यामुळे पनवेल-कर्जत मार्ग जोडला जाऊन प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
पनवेल-कर्जत हा रेल्वे मार्ग 29.6 किलोमीटरचा आहे. यात एकूण तीन बोगदे आहेत. यात वावर्ले येथे 2.6 किलोमीटरचा बोगदा आहे. या मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम यंदा पूर्ण होऊन या वर्षीच पनवेल-कर्जत उपनगरीय सेवा सुरू होऊ शकते. हा संपूर्ण प्रकल्प 2 हजार 782 कोटींचा आहे.
हेही वाचा… Bangladeshi infiltrators : मुंबईत आलेला बांगलादेशी बनला लखपती, पत्नीमुळे घुसखोराचे फुटले बिंग
हा मार्ग पूर्ण झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कर्जत व्हाया पनवेल असा प्रवास होऊ शकतो. त्यामुळे कर्जतकर आणि खोपोलीकरांच्या वेळेची तसेच पैशांची मोठी बचत होऊ शकेल. या शिवाय पनवेल ते कर्जत रेल्वे मार्गामुळे महामार्गावरील वाहतुकीला उसंत मिळू शकणार आहे. सध्या पनवेल ते कर्जत प्रवास रस्ते मार्गे म्हणजे एसटी किंवा रिक्षाने करावा लागतो. खासगी गाडी नेल्यास वाटेत टोल भरावा लागतो.
हेही वाचा… Maharashtra Weather : राज्यातील तपमानात वाढ, वाढत्या पाऱ्यामुळे नागरिक हैराण
सध्या पनवेल – कर्जत ट्रॅकवरून काही लांब पल्ल्याच्या ट्रेन धावत आहेत. हा मार्ग दुहेरी झाल्यानंतर लोकल वाहतूक सुरू होईल ज्याचा स्थानिक प्रवासांना मोठा लाभ होणार आहे. या मार्गामुळे कर्जत तालुक्याला मोठा फायदा होणार आहे. या मार्गावर पनवेलनंतर मोहोपे, चिखले, चौक आणि कर्जत ही स्टेशने आहेत. त्यामुळे नवीन वसाहती, हॉटेल इतर छोट्या उद्योगांना संधी मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
(Edited by Avinash Chandane)