घररायगडपनवेल महापालिकेच्या अंदाजपत्रकात पायाभूत सुविधांवर भर, १४९९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

पनवेल महापालिकेच्या अंदाजपत्रकात पायाभूत सुविधांवर भर, १४९९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

Subscribe

शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्य्बळ, विविध वाहने खरेदी करणे,जेटिंग मशीन खरेदी करण्यासाठी ७५ कोटी राखीव ठेवण्यात आले आहे. इंग्लिश मिडीयम शाळा, शाळेच्या इमारती, ई- लर्निंग अंतर्गत संगणक प्रशिक्षण सेवा या सर्वांसाठी २१ कोटींचा निधी महापिालकेने या अंदाजपत्रकात राखीव ठेवला आहे.

पनवेल महापालिकेचे वर्ष २०२२-२०२३ चे १४९९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी स्थायी समितीमध्ये सादर केले. कोणतीही दरवाढ, कोणतीही कर वाढ नसलेल्या अंदाजपत्रकात महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात आहे. यावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक विनयकुमार पाटील, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे, नगरसचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते. स्थायी समितीचे इतर सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

अंदाजपत्रकात बांधकाम विभागाच्या विविध पायाभूत कामांसाठी ३२६ कोटी रूपये राखीव ठेवण्यात आले आहेत. गावठाण पायाभूत सोयी सुविधा ६२ कोटी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे १० कोटी, स्वराज्य या महापालिकेच्या प्रशासकीय इमारत ४० कोटी, महापौर निवास स्थान बांधणे १२ कोटी, प्रभाग कार्यालये बांधकाम १२ कोटी, माता रमाई आंबेडकर सामाजिक केंद्र उभारणे५ कोटी, तलाव सुशोभिकरण १४ कोटी, सिडको भूखंड हस्तांतरण आणि विकास ४० कोटी अशी भरीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी मनुष्य्बळ, विविध वाहने खरेदी करणे,जेटिंग मशीन खरेदी करण्यासाठी ७५ कोटी राखीव ठेवण्यात आले आहे. इंग्लिश मिडीयम शाळा, शाळेच्या इमारती, ई- लर्निंग अंतर्गत संगणक प्रशिक्षण सेवा या सर्वांसाठी २१ कोटींचा निधी महापिालकेने या अंदाजपत्रकात राखीव ठेवला आहे. महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबविण्यासाठी २.५२ कोटीचा निधीची तरदूत अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. दिव्यांगाचे पुर्नवसन करणे त्यांना उपयुक्त योजना राबविणे, आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने ५.२६ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्राचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी आयआयटी सारख्या संस्थाची मदत घेणे तसेच हवेतील प्रदुषणाची मात्रा मोजण्यासाठीची मशिन्स महापालिका क्षेत्रात बसविण्यासाठी १.३० कोटींचा निधी खीव ठेवण्यात आला आहे.

पनवेल शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीने शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी पुर्नविकास योजना राबविण्यासाठी २०५ कोटीचा निधी या अंदाजपत्रकात राखीव ठेवण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन विभाग अद्ययावत करण्यासाठी २१ कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आला असून या अंतर्गत विविध सुविधांनी युक्त अद्ययावत वाहने खरेदी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -