Maharashtra Assembly Election 2024
घररायगडPanvel ST Depot : पनवेल एसटी डेपोत गर्दीच गर्दी, एसटी बस निवडणूक...

Panvel ST Depot : पनवेल एसटी डेपोत गर्दीच गर्दी, एसटी बस निवडणूक ड्युटीवर पाठवल्याचा रायगडमधील प्रवाशांना फटका

Subscribe

पनवेल : नेहमीप्रमाणे प्रवासी बुधवारी (20 नोव्हेंबर) पनवेल एसटी डेपोत आले. मात्र, गाड्यांची संख्या अत्यंत कमी असल्याचे प्रवाशांची दिवसभर प्रचंड गर्दी झाली होती. अखेर खासगी वाहने, रिक्षा, शेअर रिक्षा करून प्रवासी बाहेर पडत होते. विधानसभा निवडणुकीसाठी एसटी बस निवडणूक आयोगाच्या सेवेत गेल्याने प्रवाशांना असा फटका बसला. त्यामुळे प्रवाशांचा राग वारंवार अनावर होताना दिसत होता.

मतदान करून कामावर जाणारे तसेच मतदानासाठी पेण, अलिबाग, मुरुड, महाड, पोलादपूर, माणगाव तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवासांचे पनवेल एसटी डेपोत बुधवारी प्रचंड हाल झाले. निवडणुकीच्या कामासाठी 70 टक्के एसटी बस गेल्याने प्रवाशांना याची मोठी झळ सोसावी लागली. गाड्या अत्यल्प आणि वाढते प्रवासी यामुळे डेपोत दिवसभर प्रवाशांची गर्दी दिसत होती.

- Advertisement -

हेही वाचा…  Vinod Tawde : …तर सुप्रिया सुळेंनी मला पाच कोटी द्यावे, विनोद तावडे असे का म्हणाले?

- Advertisement -

शिवाय एखादी गाडी आली की त्यात शिरण्यासाठी प्रवाशांची झुंड होत होती. त्यातच त्यात मुंबईसह ठाणे, बोरिवली आदी ठिकाणांहून येणाऱ्या एसटी भरून येत असल्याने पनवेल डेपोतील प्रवाशांना गाडीत प्रवेश मिळणे कठीण जात होते. याचा प्रचंड त्रास प्रवाशांना सहन करावा लागला.

याबाबत अनेक प्रवाशांनी एसटीच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले. मात्र, विधानसभा ड्युटीवर गाड्या गेल्याने प्रवासांनी संयम राखावे, असे आवाहन ते करत होते. मात्र, दिवसभर अशीच परिस्थिती होती. त्यामुळे जास्त पैसे खर्च करून प्रवाशी खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागला. यात ज्येष्ठ नागरिक, महिलांचे खूप हाल झाले. रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्व एसटी डेपोंमधील परिस्थिती पनवेलप्रमाणेच होती.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -