घररायगडभोगावती नदीच्या स्वच्छतेसाठी पेणकरांचा ‘जलसंवाद’

भोगावती नदीच्या स्वच्छतेसाठी पेणकरांचा ‘जलसंवाद’

Subscribe

तालुक्याच्या अनेक गावांना जोडून ही भोगावती नदी जात आहे.त्यामुळे भविष्याच्या काळामध्ये या नदीचे वाळवंट होऊ नये याकरिता हा खटाटोप चालला असून नदीचे जलसंवर्धन होणे आवश्यक आहे. नदीच्या सर्वेचे काम अनेक जलप्रेमींच्या मदतीने सुरू असून यामध्ये नदीचे गाळ काढणे, भाराव, तर काही ठिकाणी असणारे अतिक्रमणे आणि गावागावातील गटारांचे येणारे पाणी हे शासकीय पातळीवर तात्काळ थांबवावे लागणार आहे.

 

पेण: येथील, भोगावती नदी संवर्धनाचे काम गेले अनेक वर्ष सुरू असून नदी जवळपास ६५ टक्के गाळाने भरलेली आहे. त्यामुळे सदर नदी आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी आता जलसंवादातून सुरूवात करण्यात आली असून यासाठी सामाजिक संघटनांनी पावले उचलली आहेत.
तालुक्याच्या अनेक गावांना जोडून ही भोगावती नदी जात आहे.त्यामुळे भविष्याच्या काळामध्ये या नदीचे वाळवंट होऊ नये याकरिता हा खटाटोप चालला असून नदीचे जलसंवर्धन होणे आवश्यक आहे. नदीच्या सर्वेचे काम अनेक जलप्रेमींच्या मदतीने सुरू असून यामध्ये नदीचे गाळ काढणे, भाराव, तर काही ठिकाणी असणारे अतिक्रमणे आणि गावागावातील गटारांचे येणारे पाणी हे शासकीय पातळीवर तात्काळ थांबवावे लागणार आहे.त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून काही दिवसांपूर्वी शासकीय पातळीवर याची पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्याचे आखले आहे.
स्वच्छ सुंदर निर्मल अमृतवाहिनी राखण्यासाठी समाज प्रबोधनाचे काम गेले अनेक वर्ष सुरू असून या अनुषंगाने जय दिंडीचे आयोजनही महिन्याच्या सुरुवातीला होत आहे. यामध्ये नदीकिनारी स्वच्छता मोहिमेत आरतीचे आयोजन यासह विविध उपक्रमाद्वारे भोगावती नदी संवर्धनाकरीता जनसामान्यांना जोडण्याचे काम या सर्व सामाजिक संघटना करीत आहेत. यापूर्वी तालुकास्तरीय विद्यार्थी मर्यादित नदी संवर्धन काळाची गरज या विषयांवरील निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी म्हणून नदी जलसंवाद साधण्यासाठी आता गावोगावी प्रचार आणि प्रसार केला जात आहे.यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन समाज प्रबोधन मंच पेणच्यावतीने करण्यात येत आहे. याकरीता परीक्षक म्हणून श्रीकांत म्हात्रे, स्वेता सावंत, मंचाचे अध्यक्ष बी.ए. पाटील, कार्याध्यक्ष रुपेश कदम, सेक्रेटरी मनोज पाटील, एच. एम. पाटील, रवींद्र पाटील, बळी मोरे, प्रा. उदय मानकावळे आदिंसह विद्यार्थी यासाठी मेहनत घेत आहेत.
भोगावती नदी ही पेणकरांसाठी श्वास आहे आणि या नदीचा श्वास रोखता कामा नये याकरिता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तसेच विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून मार्फत नदी स्वच्छ करण्याचे काम करीत आहोत. नागरिकांचा सहकार्य मोठ्या प्रमाणावर मिळत असून शासनाने लवकरात लवकर नदी संवर्धन कार्यक्रमातून तिची जोपासना करावी.
– प्रा. उदय मानकावले,
पर्यावरण मित्र

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -