घररायगडप्रेयसीच्या भावाचा काटा काढण्यासाठी ८० हजारांची सुपारी, माणगाव गोळीबारप्रकरणी चार जणांना अटक

प्रेयसीच्या भावाचा काटा काढण्यासाठी ८० हजारांची सुपारी, माणगाव गोळीबारप्रकरणी चार जणांना अटक

Subscribe

शुभम १२ फेब्रुवारीच्या रात्री मेडीकल बंद करून घरी परतत होता. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्यांपैकी मागे बसलेल्या इसमाने शुभमच्या पोटावर गोळी झाडली होती. त्यानंतर ते मुंबई-गोवा महामार्गाने इंदापुर बाजूकडे पळून गेले होते.

माणगाव येथील मेडीकल दुकानदार शुभम ग्यानचंद्र जयस्वाल (२४) यांच्यावर गोळीबार करणार्‍या चार जणांच्या मुसक्या रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या आहेत. प्रेमसंबंधाला विरोध होत असल्यानेच आरोपीने त्यांच्या मित्रांना ८० हजार रुपयांची सुपारी देऊन प्रेयसीचा भाऊ शुभम याचा काटा काढण्यास सांगितल्याचे समोर आल्याची माहिती अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत दिली.

मयुर सुरेश गवळी (२१ रा. मुंब्रा ठाणे), अजय महादेव अवचार (२०), राजेश विजय शेळके (२२) आणि नितीन शिरमाजी कांबळे (२४, सर्व राहणार रबाळे,नवी मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याचा शोध घेत असल्याचे झेंडे यांनी सांगितले. मुख्य आरोपी मयुर सुरेश गवळी याचे शुभम जैसवाल यांच्या बहीणीशी इन्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळले होते. मात्र या गोष्टीस शुभमचा विरोध होता. शुभम आपल्या बहीणीला मोबाईल वापरु देत नव्हता. या गोष्टीचा मनात राग धरून मयुर याने शुभमला संपविण्याठी ८० हजार रुपयांची सुपारी दिली होती.

- Advertisement -

शुभम १२ फेब्रुवारीच्या रात्री मेडीकल बंद करून घरी परतत होता. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्यांपैकी मागे बसलेल्या इसमाने शुभमच्या पोटावर गोळी झाडली होती. त्यानंतर ते मुंबई-गोवा महामार्गाने इंदापुर बाजूकडे पळून गेले होते. पोलिसांना पल्सर मोटरसायकलकळमजे गावचे रोडलगत नदीकिनारी बेवारस स्थितीत मिळून आली. मोटासायकल मालकाचा शोध घेतला असता ती वाशी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झाल्याचे समोर आले. मोटरसायकल चोरी करतानाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती सापडले. त्यानंतर शुभमचे वडील ग्यानचंद जैसवाल यांना त्याच्या फोनवर कॉल करून अज्ञाताने दोन करोड़ रूपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास तुझ्या परिवाराला मारू अशी धमकी दिली. पोलिसांनी सीडीआरच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत त्यांना नवी मुंबईमधून अटक केली. गोळीबार करण्यासाठी वापरलेला गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्याचे झेंडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -