पनवेल : भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कायम दलित, मागासवर्गीय समाजाचे हित पाहिले. म्हणूनच इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात फलक झळकावले होते. यासाठी त्यांचे एक दिवसाचे निलंबन झाले होते. महाडमधील चवदार तळे या राष्ट्रीय स्मारकाचे सौंदर्यीकरण आणि जलशुद्धीकरणाच्या कामासाठी त्यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोन प्रक्रिया करून चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण आणि जलशुध्दीकरणासाठी 65.52 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या कामाची कार्यवाही होत आहे. या पार्श्वभूमीवर दलित, मागासवर्गींयांसह सर्वांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या प्रशांत ठाकूर यांना समाज मताधिक्य देऊन विजयी करणार, असा विश्वास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस आणि मागासवर्गीय समाजाचे नेते अॅड. प्रकाश बिनेदार यांनी व्यक्त केला आहे.
प्रशांत ठाकूर यांची भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपार श्रद्धा आहे. पनवेल आणि परिसरात अनेक ठिकाणी बुद्धविहार आणि समाजमंदिरे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत उभारण्यात आली आहेत. कामोठ्यात नालंदा बुद्धविहाराची स्थापना केली. नवीन पनवेलमध्ये भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भवन निर्मितीला पाठबळ दिले. तसेच बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्धविहार, शिवकर, रोडपाली अशा अनेक ठिकाणी बुद्धविहारांच्या उभारणीसाठी ठाकूर पितापुत्राने सहकार्य केले आहे.
समाजाचे हित जपणारा पक्ष ही भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. त्यामुळे सर्व समाजाच्या हिताच्या योजना सुरू राहण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे, याकडे बिनेकर यांनी लक्ष वेधले आहे. तसेच पनवेल विधानसभा मतदारसंघातील दलित, बौद्ध, चर्मकार, मातंग आदी सर्व समाज लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबरला कमळ निशाणीसमोरील बटन दाबून आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडून देण्याचा निर्णय सर्व समाजाने घेतल्याचे प्रकाश बिनेदार यांनी स्पष्ट केले.
(Edited by Avinash Chandane)